: शेतीची कामे, तिचे संधारण आणि सर्वसाधारण सेवा यांसाठी वापरण्यात येणारी अवजारे व यांत्रिक साधनसामगी यांमुळे शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत होते. मानवी श्रम वाचविण्यासाठी प्राचीन काळात लावण्यात आलेल्या शोधांची संख्या थोडीच होती. नाईल व पो नद्यांच्या खोऱ्यांसारख्या समृद्घ क्षेत्रांतच शेतीचा उत्कर्ष झालेला आढळतो. कारण तेथेच सधन शेती होत असे. हाताने वापरावयाचे फावडे व कुदळ, माणसाने वा बैलामार्फत ओढावयाचा वाकड्या काठीचा नांगर वा बशासारखे ओढावयाचे अवजार ही साधने माणसाने वस्ती करुन शेती करायला सुरुवात केल्यानंतर पाच हजार वर्षे वापरात होती. अगदी धातूंचा शोध लागल्यावरही धातूचे कुदळ, फावडे, नांगर व इतर अवजारे यांचे थोडेच शोध पुढे आले. ईजिप्तमधील तसेच गीक व रोमन लोकांनी शेतीच्या अवजारांमध्ये अगदीच थोड्या सुधारणा केल्या. अमेरिकेतील मूळ संशोधकांनीही रोमन लोक वापरीत असलेल्या अवजारांसारखी लाकडी अवजारे बनविली (१७००). शेतीमधील यांत्रिक युगाची उत्कांती ही उद्योगातील व वाहतुकीतील उत्कांतीच्या बरोबर झाली. मात्र विसाव्या शतकापर्यंत हाताने वापरावयाच्या अवजारांऐवजी यंत्रांचा वापर व्यापक प्रमाणात झाला नव्हता. अजूनही जगातील मोठ्या भागात हातात कुदळ घेतलेला माणूस हा शेतजमीन कसणाऱ्या माणसाचे प्रतीक म्हणून राहिला आहे. नांगरामधील सुधारणा १६०० सालापर्यंत अगदी मंद गतीने होत होती. त्या काळात काही ब्रिटिश जमिनदारांनी नांगरात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती. जेथो टल (१६७४-१७४१) यांनी १७३३ च्या सुमारास इंग्लंडमध्ये शेतीच्या मशागतीचा प्रचार केला. अठराव्या शतकात यानंतर टॉमस जेफर्सन यांनी अगदी चांगल्या नांगरटीचा पुरस्कार केला. १८१४ सालामध्ये जेथो वुड (१७७४-१८३४) यांनी एका नांगराचे एकस्व (पेटंट) घेतले. या नांगरात लाकडी फाळावर अनेक लोखंडी खंड आच्छादले होते. असा लोखंडी खंड (तुकडा) जमीन नांगरताना दगड मधे आल्याने तुटला तर सहजपणे बदलता येत असे. तथापि विशेषकरुन प्रेअरी प्रदेशातील [→ गवताळ प्रदेश] राज्यांमधील कठीण शेतजमिनीसाठी अधिक चांगल्या नांगराची आवश्यकता होती. सुमारे १८३३ साली जॉन लेन (न्यूयॉर्क राज्य), जॉन डिअर (१८०४-८६; इलिनॉय) व जेम्स ऑलिव्हर (१८२३-१९०८; इंडियाना) यांनी ओतीव घडीव पत्र्यापासून कार्यक्षम पोलादी नांगर तयार केला. हा जमीन भुसभुशीत करणारा नांगर १८७० सालापर्यंत प्रमाणभूत झाला. दाट झाडीखाली फिरण्यासाठी लागणाऱ्या लोळण फणासारख्या जोडण्या कधीकधी नांगराला बसवीत. अमेरिकेतील यादवी युद्घानंतर शेतजमिनीसाठी वापरावयाची इतर यंत्रसामगी वापरात आली. यामध्ये पोलादी कुळव (वखर), तव्यांचा नांगर, १८५६ साली एकस्व दिलेले कोळपे व दातेरी वखर यांचा अंतर्भाव होता. दातेरी वखर पोलादी होते व कचरा निघून जावा म्हणून दाते तिरपे करण्याची सोय (प्रयुक्ती) त्यात होती. कर्षक व लाट ही अवजारे आधीपासून सामान्य वापरात होती. इंग्लंडमधील टल यांनी ओळीत बी पेरण्यासाठी पहिली पाभर तयार केली. मात्र हे यंत्र तयार केले म्हणून त्यांच्याकडील कामगारांनी त्या शोधाच्या निषेधार्थ संप केला होता. अमेरिका हा देश १८०० सालानंतर शेतकामाच्या यंत्रांचा विकास करणारा आघाडीवरील देश झाला. तेथे इंग्लंड व यूरोप खंडातील इतर देशांमधून आलेल्या कल्पनांमध्ये अमेरिकेतील संशोधकांनी सुधारणा करुन हे साध्य केले होते. १६०० सालापासून काही प्रकारची कापणी यंत्रे वापरात होती. मात्र इंग्लंडमधील पॅट्रिक बेल, तसेच अमेरिकेतील ओबद हसी व सायरस हॉल मॅक्कॉर्मिक यांनी लावलेले शोध सु. १८५० सालापर्यंत मोठ्या प्रमाणावर वापरात आले नव्हते. मॅक्कॉर्मिक यांनी कापणी उद्योग स्थापन केला आणि तो जगभर पसरला. त्यांनी यातील सुधारणा स्वीकारल्यामुळे त्यांची यंत्रे शंभर वर्षे आघाडीवर राहिली. अमेरिकेमध्ये १८७० ते १९१० या काळात शेतकामाच्या यंत्रांचा वापर करण्यात हळूहळू पण स्थिर अशी प्रगती होत गेल्याचे आढळते. १९१० सालानंतर ⇨ यांत्रिक शेती मध्ये वेगाने बदल झाले. १९५० पासून अमेरिकेतील कृषी उत्पादन जवळजवळ संपूर्णपणे यंत्रांच्या साहाय्याने होऊ लागले. शेतकामाकरिता मध्यम आकारापासून ते मोठी यंत्रे तयार करण्यात आली. मोठ्या आकाराची शेती आणि भांडवल असलेल्या ठिकाणी मोठी यंत्रे आणि ट्रॅक्टर यांचा कृषी उत्पादनाकरिता सर्रास वापर होऊ लागला. विकसनशील देशांतील शेतीत काही तुरळक क्षेत्रात यांत्रिकीकरण झालेले आहे. भारत व मध्यपूर्वेतील देश, आफिका आणि लॅटिन अमेरिका या ठिकाणी शेतकामाकरिता लहान व मोठी यंत्रे आणि ट्रॅक्टर यांचा संमिश्र वापर करण्यात येतो. भारतात लहान आकाराची शेती, जलसिंचित जमिनीचे एकंदर लागवडीखाली असलेल्या क्षेत्राशी अल्प प्रमाण यांमुळे यंत्रसज्ज शेतीचे प्रमाण अल्पच आहे. शेतकामाकरिता पुढील प्रकारची यंत्रे वापरण्यात येतात : ट्रॅक्टरचलित (कर्षित्रचलित)२४-फूट थाळी असलेला नांगर; तण काढण्याकरिता आठ ओळींचा कल्टिव्हेटर; भात व गहू यांकरिता संयुक्त कापणी व मळणी यंत्र (कम्बाइन); खत विस्कटणारे यंत्र; वाफे तयार करणारे व खत घालणारे बहुउद्देशीय यंत्र; ड्रिलच्या साहाय्याने शेतजमिनीत बी टोकून ते मातीने झाकणारे यंत्र; वेल कापून त्यातील फळे गोळा करुन चांगली फळे ट्नकमध्ये भरणारे टोमॅटो हार्वेस्टर यंत्र; द्राक्ष फळांसारख्या वेलांवरील फळांचे घड गोळा करुन वाहक पट्टयद्वारे ट्नकमध्ये भरणारे यंत्र; शेतातील उसाची तळाशी व वरील बाजूला तोडणी करुन आणि त्याची पाने काढून उसाच्या कांड्या गोळा करणारे यंत्र; बटाट्याचे पीक खणून मातीतून बाहेर काढून स्वयंचलित रीत्या ट्नकमध्ये भरणारे पोटॅटो कम्बाइन यंत्र; बीट पिकाची पाने काढून टाकल्यानंतर जमिनीतून मगजयुक्त मुळे गोळा करणारे यंत्र; शेतामध्ये यांत्रिक रीत्या कापसाची बोंडे गोळा करणारे यंत्र; कीटकनाशक औषधाची फवारणी करणारे यंत्र इत्यादी. यांपैकी काही यंत्रांची छायाचित्रे चित्रपत्रांमध्ये दिलेली आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment