0

सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील शेतकर्‍यांना वेळोवेळी दुष्काळाशी सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी आधार म्हणून मोठय़ा अपेक्षेने पिक विमा भरला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत २४ हजार शेतकर्‍यांनी रब्बी पिकासाठी ७७ लाख १0 हजार ४४३ रूपये एवढी विम्याची रक्कम भरणा केली आहे. मंगळवेढा तालुक्यात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मंगळवेढा, भोसे, नंदेश्‍वर, निंबोणी, ब्रह्मपुरी, आंधळगाव, मार्केटयार्ड, हुन्नूर, लक्ष्मीदहिवडी, मरवडे, सलगर, सिद्धापूर, हुलजंती या १४ डी.सी.सी. बँकेच्या शाखांमधून शेतकर्‍यांनी गहू, ज्वारी, करडई यासह फळपिकांच्या विम्यापोटी ७७ लाख १0 हजार रूपये एवढा भरणा केला आहे. गेल्या काही वर्षापासून तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक वर्षी कमी होत असलेली पर्जन्यवृष्टी त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या फेर्‍यात अडकला आहे. यंदा पाऊस चांगला पडला असून शेतकर्‍यांची रब्बी पिकेही जोमात आली आहेत. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये चार पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. सन २0११-१२ मध्येही पावसाने हुलकावणी दिल्याने रब्बी हंगाम शेतकर्‍याच्या हातातून गेला होता. त्यामुळे आमदार भारत भालके यांनी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी शासन दरबारी प्रय▪करून तो जाहीर केला होता. यंदा ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे.

शेतकरी हिताच्या नावाखाली सुरू असलेल्या बर्‍याच योजना किचकट निकषामुळे फसव्या आहेत. आसमानी संकटामुळे ५0 टक्क्याच्या पुढे नुकसान झाले तरच भरपाई दिली जाते. पिक विमा योजनेसाठी शेतकर्‍यांचे वैयक्तीक नुकसान गृहीत न धरता सर्कलचे उंबरठा उत्पादन प्रमाण मानले जाते. तरी या निकषामध्ये योग्य बदल करून शेतकर्‍यांना पिक विम्याचा लाभ हा सरसकट द्यावा. - दिलीप सावंत, संचालक, कृषी उद्योग संघ, मंगळवेढा.

Post a Comment

 
Top