:
संकलन - दत्तात्रय नवत्रे
* उमेदवारांना अर्जाचा प्रत्येक रकाना भरणे बंधनकारक असून मतदारांना या निवडणुकीत 'नोटा'चा वापर करता येणार आहे. - व्हीएस संपत.
* ७ फेब्रूवारी रोजी पार पडणा-या दिल्ली विधानसभा निवडणुकीत १.३० कोटी मतदार आपला मतदानांचा अधिकार बजावणार असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
* दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून ११ हजार ७६३ मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे.
* मेपर्यंत सरकार स्थापन करणे बंधनकारक असणार - मुख्य निवडणूक आयुक्त व्हीएस संपत
* दिल्ली विधानसभा निवडणुकींची घोषणा, ७ फेब्रूवारीला मतदान तर १० फेब्रूवारीला निकाल जाहिर होणार असल्याची मुख्य निवडणूक आयुक्त व्हीएस संपत यांची माहिती.
* कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीतील विजयानंतर पैसे उडवणा-या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
* जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार, बीएसएफ जवानांनी दिले गोळीबाराला सडेतोड प्रत्यूत्तर.
* अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांच्या ताफ्यातील गाडीला गुजरातमध्ये अपघात. केरी यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते भारतभेट संपल्यानंतर विमानतळाकडे जात असताना झाला अपघात.
* नवी दिल्ली: कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीतील विजयानंतर आप उमेदवाराच्या समर्थकाने पैसे उधळल्याने नवा वाद
* आमीर खानच्या बहुचर्चित 'पीके' चित्रपटाने देशभरात ६२० कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावणारा तो बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट ठरला आहे.
* साखर संकुलातील तोडफोडीप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
* - प्रवीण दरेकर आणि वसंत गीते उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त.
* ऊसदर प्रश्न पेटला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील साखर कारखान्यात केली तोडफोड, सरकारी वाहनही पेटवले.
* भारत पाकिस्तानविरोधात लढा देण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत आहे - पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांचा कांगावा
* गेल्या वर्षीच्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये २० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा झाली होती, मग अजून ते पैसे का आले नाहीत ? - आनंद शर्मा, काँग्रेस नेते
* नागपूरमध्ये नायलॉन मांज्यावरील बंदी कायम, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल.
* बीडमधील संत जगन्मित्र सूतगिरणी प्रकरण: धनंजय मुंडेना अटक करण्याची पोलिसांनी मुभा, औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामिनाच्या अंतरिम आदेशाला दिली स्थगिती .
* अनिवासी भारतीय मतदारांसाठी आठ आठवड्यात इलेक्ट्रॉनिक व्होटींगची सुविधा उपलब्ध करुन द्या - सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश.
* माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील फरार आरोपी कुमारन पद्मनाथन उर्फ केपीने श्रीलंकेतून पळ काढला, केपी सध्या पाक किंवा चीनमध्ये असल्याचा संशय.
* साध्वी प्राची यांच्यासारख्या नेत्यांसाठी वेळ खर्च करुन उपयोग नाही, त्यांना कोणीही गांभीर्याने घ्यायला नको - वृंदा करात
* - दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या बैठकीस सुरूवात.
* जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर ए तोयबाच्या कमांडरला सुरक्षा दलाने अटक केली, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत.
* - एक मुलगा सीमेवर देशाची रक्षा करेल, एकाला संताकडे द्या, एक जण समाजासाठी काम करेल, एक जण संस्कृतीचे रक्षण करेल जे अत्यंत महत्त्वाचे आहे - साध्वी प्राची
* - वाघाकडून आम्हाला फक्त एक नव्हे तर चार मुलं हवीत - विहिंप नेत्या साध्वी प्राची यांचे हिंदूना उद्देशून विधान
* दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा अजय माकन यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता.
* औरंगाबाद कँटोन्मेंट निवडणूक निकाल, तीन जागांवर अपक्ष विजयी, शिवसेना - भाजपाचा प्रत्येकी दोन जागांवर विजय.
*- नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भाजपाचा पराभव, वाराणसी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत सातही जागांवर भाजपा पराभूत, अपक्ष उमेदवारांनी केला पराभव
______________________________________bylokmat
🙏
Post a Comment