0


संकलन - दत्तात्रय नवत्रे

*आपण प्रत्येक स्तरावर महात्मा गांधींजींचे अनुकरण केले पाहिजे - प्रणव मुखर्जी

* शिक्षणात शिखर गाठल्यावरच आपण २१ व्या शतकामध्ये नेतृत्व करु शकू - प्रणव मुखर्जी

* महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरण करणारे देशच जागतिक महासत्ता बनू शकतात - प्रणव मुखर्जी

*तीन दशकानंतर देशाच्या जनतेने एकाच पक्षाला बहुमत देत स्थिर सरकार स्थापन केले - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

* प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी देशवासीयांना संबोधित करत आहेत.

*अमेरिकेसोबतच्या नागरी अणु करारातील सर्व मतभेद दूर झाले आहेत - सुजाता सिंह, परराष्ट्र सचिव

*जालना येथे तीर्थपूरी गावात कुत्रांच्या हल्ल्यात सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू, महेश जाधव असे मृत मुलाचे नाव असून मुलाच्या कुटुंबीयांनी महापालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला.

* संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमचे सदस्यत्व मिळावे यासाठी आमचा पाठिंबा - ओबामा

*रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत व्हावी आणि त्यांचा विकास होऊ नये असे आम्हाला वाटत नाही - ओबामा

*संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान सहकार्य, उर्जा निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये भारतासोबत काम करणार - अमेरिका

*- अजमेर, अलाहाबाद आणि विशाखापट्टणम या शहरांच्या विकासात अमेरिकेा मदत करणार - ओबामा

* दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न - ओबामा

*'चाय पे चर्चा'साठी निमंत्रण दिल्याबद्दल मोदींचे आभार - ओबामा

*- मॅडिसन स्क्वेअर येथील मोदींच्या भाषणातून दोन्ही देशांमधील जनतेमध्येही मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे दिसून आले - ओबामा

*भारतवासीयोंको मेरा प्यार भरा नमस्कार - ओबामा

* अमेरिका - भारताचे संबंध दृढ होतील, दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध जगाच्या हिताचे - मोदी

* नागरी अणू करार हा दोन्ही देशांमधील चर्चेचा केंद्रबिंदू - मोदी

*प्रत्येक देशाने दहशतवादचे चांगला व वाईट दहशतवाद असा भेदभाव न करता त्याचे समुह उच्चाटन केले पाहिजे - ओबामांसमोर मोदींनी पाकला सुनावले

* दोन्ही देशांमध्ये आता व्यापारी संबंधही निर्माण होत असून संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील - मोदी

*भारत आणि अमेरिकेचे नैसर्गिक नाते असून ते पुढे नेण्याची गरज - मोदी

* ओबामा हे व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून भारत दौ-यावर आले यासाठी त्यांचे आभार - मोदी

* बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांचे स्वागत करणे हा माझा सन्मान - मोदी

*सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा,फायनलमध्ये सायना नेहवालने स्पेनच्य कॅरोलिना मारीनचा १९ - २१, २५ -२३, २१-१६ ने पराभव करत विजेतेपद कायम राखले.

* शहीद इरप्पा कनकवडी, शहीद उत्तम भिकले यांना अशोक चक्र, गणेश डोके यांनाही अशोक चक्र.

*ओबामा - मोदी भेट, नागरी अणुकरारासंदर्भात दोन्ही देशांची सहमती झाल्याचे वृत्त.

* दिल्लीतील भटक्या कुत्र्याने भेदले ओबामांचे सुरक्षा कवच, राष्ट्रपती भवनात ओबामांच्या आगमनापूर्वी भवनाच्या प्रांगणात भटक्या कुत्राचा मुक्तसंचार, कुत्र्याला हाकलण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची धावपळ.

*ओबामांना दिल्या जाणा-या गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व करायला मिळणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद, माझ्यामुळे अन्य मुलींना प्रेरणा मिळाली असेल तर ते चांगलेच - विंग कमांडर पूजा ठाकूर

_______________________________________

Post a Comment

 
Top