0

पंढरीतील घटना; तिघांना अटक
पंढरपूर / शहर प्रतिनिधी
लग्नाच्या वरातीत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून युवकाचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना गुरूवारी (दि. २६) रात्री १0 वाजण्याच्या सुमारास येथील बेंगलोरकर मठासमोरील रस्त्यावर घडली. सुधीर प्रकाश मोरे (वय २१, रा. बडवेचर झोपडपट्टी, संतपेठ, पंढरपूर) असे मयत युवकाचे नांव आहे. याप्रकरणी वैभव भारत शिर्के, डूम्या ऊर्फ संदेश शरद शिर्के व शक्ती पिंटू शिर्के (सर्व रा.भाई-भाई चौक) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. एका लग्नाच्या वरातीत नाचताना सुधीर मोरे याचा वैभव शिर्के याला धक्का लागला. या कारणावरून बाचाबाची होऊन सदर तिघांसह त्यांच्या इतर ३ ते ४ साथीदारांनी सुधीर मोरे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान वैभव शिर्के याने खिशातून चाकू काढून सुधीरच्या डाव्या बरगडीत खुपसला. यामध्ये गंभीर जखमी होऊन सुधीर याचा मृत्यू झाल्याची फिर्याद दीपक प्रकाश मोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. शुक्रवारी दुपारी यातील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक देशमुख हे करीत आहेत.

Post a Comment

 
Top