0

सोलापूर / प्रतिनिधी
पर्यावरण खात्यांच्या मंजूरीनंतर राज्यात सर्वात आधी सोलापुर जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. तीन टप्प्यात झालेल्या ऑनलाईन वाळू लिलावात १५ वाळू साठय़ांचा लिलाव झालेला असून त्यापैकी ६ ठेकेदारांकडून ५0 कोटी १५ लाख रुपये महसूल मिळाला आहे. संपूर्ण राज्यात सर्वात आधी सोलापूर जिल्ह्यात वाळू लिलावाला मंजूरी मिळाल्यानंतर ऑनलाईन लिलाव प्रक्रिया झाली. जिल्ह्यासाठी ५0 वाळू साठय़ांसाठी तीन टप्प्यात लिलाव करण्यात आला. एकूण १५ वाळूसाठय़ांचा लिलाव झालेला असून त्यातील ६ ठेकेदारांकडून ५0 कोटी १५ लाख रुपये महसूल शासनाकडे जमा केला आहे. पैसे भरलेल्यांमध्ये पोहोरगाव वाळू साठय़ाचा ताबा अभिजीत पाटील यांना, वडापूर सिद्धापूर संयुक्त साठय़ाचा ताबा रघुनाथ नागणे यांना, अक्कलकोट तालुक्यातील आळगे येथील साठय़ाचा ताबा सुरेश काटगाव यांना, भंडारकवठे येथील साठय़ाचा ताबा आप्पासाहेब पाटील यांना, तर शेटफळ-ममदाबाद येथील वाळूसाठय़ाचा ताबा विनोद रोंगे यांना देण्यात आला आहे. मात्र, सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथील साठा घेतलेल्या संदीप साळुंखे यांना पैसे भरूनही साठा ताब्यात देण्यात आलेला नाही. तसेच करमाळा तालुक्यातील निमगाव आणि कोंढार चिंचोळी येथील वाळू साठय़ाच्या लिलावाला आणि महसूल मंत्र्यांकडून स्थगिती मिळालेली आहे. सांगोला तालुक्यातील खवासपूर, वाढेगाव, तसेच कुसूर-सिद्धापूर संयुक्त आणि शेगाव दुमाला-मुंढेवाडीच्या साठय़ाला न्यायालयाकडून स्थगिती मिळालेली आहे.

Post a Comment

 
Top