0

मुंबई : सर्व इच्छुक अविवाहित तरुण, तरुणींनो आणि त्यांच्या माता पित्यांनो, लग्न सराई संपत आहे...!! पुढे दीड वर्ष लग्न तिथीच नाही.!! १२/०६/२०१५ हि लग्नसराई ची शेवटची तारीख आहे.त्यानंतर पुढे अधिक महिना व त्यापुढे १३ महिने सिहास्थ कुंभमेळा असल्याने व त्यापुढे लगेच चातुर्मास असल्याने सुमारे २०१७ मध्येच विवाह होतील. अर्थात भावी वधू-वरांचे विवाह १२/०६/२०१५ पर्यंत होणे जरुरीचे आहे. आज पासून १२/०६/२०१५ पर्यंत मोजून ५६ लग्न तिथी आहे. त्यात स्थळ शोधणे, कुंडली जुळविणे, लग्न नक्की करणे, साखरपुडा आणि त्यानंतर विवाहाकरिता कार्यालय बुकिंग करणे गरजेचे आहे. लग्न सराई संपत येण्याची वाट बघू नका. वेळ कमी आहे. जून २०१५ पर्यंत विवाहाच्या वयात २ वर्षाचे मोठे अंतर वाढणार आहे. यासाठी आजच स्थळ संशोधन सुरु करा. मात्र ज्यांना तिथी न पाहता लग्न करायवयाचे असेल, ते कधीही लग्न करू शकतात, म्हणतात ना, मियाँ-बीबी राजी तो क्या करे काझी!

Post a Comment

 
Top