संकलक - दत्तात्रय नवत्रे
दि.25/2/15
*मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावचे पत्रकार दत्ता कांबळे (9890989593) यांना अवैध दारूधंद्याची बातमी छापली म्हणून दारू विक्रेत्याकडून मारहाण.
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाकडून निषेध व्यक्त करून पोलीसांत गुन्हा दाखल.
*पत्रकारास मारहानीचा सर्व स्तरातून निषेध
*सदर रड्डे गावातील महिला 15 ऑगस्ट पासून दारूबंदीसाठी झगडत आसून ग्रामसभेत ठराव होवून ही अवैध दारूविक्री सुरूच ; पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
* सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट. विदेशातील काळया पैशांबाबत मोदी सरकार गंभीर नसल्याचे अण्णांना सांगितले.
*- गरज नसल्यास पाकिस्तानात जाण्याचे टाळा : अमेरिकन सरकारचा नागरीकांना सल्ला.
*युएईनं ठेवलेलं २७९ धावांचं लक्ष्य आयर्लंडने ४९.२ षटकांत पूर्ण केलं. ६९ चेंडूंमध्ये ८० धावा करणारा गॅरी विल्सन प्लेअर ऑफ दी मॅच ठरला.
* शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक लढतीत आयर्लंडने युएईचा दोन गडी राखून पराभव केला.
*दिल्लीकरांना खुशखबर : ४०० यूनिटपर्यंत वीज वापरणा-या दिल्लीकरांना ५० टक्के वीज मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.
*'आप'च्या सरकारची निवडणूक घोषणांची अंमलबजावणी सुरू : दिल्लीकरांना मिळणार २० हजार लीटर मोफत पाणी.
* भूमी अधिग्रहण विधेयकासंदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
*- लैंगिक शोषणातील आरोपी आर.के. पचौरी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
*- महसूल मंत्री एकनाथ खडसे गोत्यात, अकोल्यातील शेतकरी विरोधी विधानासाठी खडसे यांची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे जाफराबाद कोर्टाचे आदेश.
* अमेरिकेतील एच१बी वीसा धारकांच्या साथीदाराला अमेरिकेत काम करण्यास परवानगी मिळणार, हजारो भारतीयांना या निर्णयाचा लाभ होणार, यापूर्वी एच१बी वीसा धारकांच्या पतीला किंवा पत्नीला अमेरिकेत काम करण्याची परवानगी नव्हती.
* सोनिया गांधी यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आडवाणी यांचा आज लग्नाचा ५० वा वाढदिवस आहे.
* जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव नाही - केंद्र सरकारचे राज्यसभेत लेखी उत्तर.
*दिल्लीतील जंतरमंतर येथे काँग्रेसचे जमीन वापसी आंदोलन, भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात हे आंदोलन सुरु असून आंदोलनात काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित.
*- दिल्ली रेल्वे स्थानकावर बनावट नोटा बाळगणा-या दोघांना अटक, मालदाहून आलेल्या दोघा तरुणांकडे सुमारे २० लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा होत्या.
* अमृतसर विमानतळावर अमेरिकेतून आलेल्या महिलेला अटक, तपासणीदरम्यान महिलेकडे आढळली २५ जीवंत काडतूस आढळले.
शिवसेनेला भूसंपादन विधेयक अमान्य, विधेयकात बदल केल्याशिवाय पाठिंबा नाही, शिवसेना खासदारांच्या बैठकीत निर्णय, भाजपासमोरील अडचणी वाढल्या.
* बिल्डर प्रदीप जैन हत्याप्रकरण, कुख्यात डॉन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा, टाडा न्यायालयाचा निकाल.
*मालेगावचे प्रांताधिकारी संदीप पाटील यांना सव्वा दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक,अँटी करप्शन ब्यूरोची कारवाई.
*काळवीट शिकार प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी करावी,प्रकरणातील १५ ते २० साक्षीदारांना पुन्हा कोर्टात बोलवून साक्ष घ्यावी, सलमानच्या वकिलांची न्यायालयाला विनंती, या मागणी अर्जावर ३ मार्च रोजी होणार विचार विनिमय.
* काळवीट शिकार प्रकरण, सलमान खानला सुनावणी दरम्यान अनुपस्थित राहण्यास न्यायालयाकडून परवानगी
*काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला तात्पुरता दिलासा, अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमाविरोधात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल ३ मार्चला.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
Post a Comment