0

पोर्ट लुई : मॉरिशसच्या विकासासाठी भारताकडून 50 कोटी डॉलरची म्हणजेच 32 अब्ज मदत करेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पंतप्रधान मोदी सध्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. मॉरिशसच्या दौऱ्यात मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांनी पाच करारांवर स्वाक्षरी केली आहे. सागरी सहाय्य, शेती, सांस्कृतिक, पारंपरिक औषधी अशा विषयांशी हे पाचही करार संबंधित आहेत. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी पोर्ट लुई शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या गंगा तलावावरही हजेरी लावली. त्याठिकाणी पंतप्रधान मोदींनी महादेवाच्या मूर्तीची पूजाही केली. मॉरिशसमध्ये भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच इथल्या गंगा तलावाला स्थानिक लोक हे गंगेसमान पवित्र मानतात.

Post a Comment

 
Top