मंगळवेढा / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेमधील वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना भविष्यकाळात आधारकार्डशी जोडणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. मंगळवेढा येथे पंचायत समितीमधील सर्व खात्यांचा आढावा घेण्यासाठी ते आले असताना बोलत होते. काकाणी यांनी अचानकपणे मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचार्यांची झाडाझडती घेत स्वच्छतेविषयी त्यांना धडे दिले. त्यानंतर मरवडे येथील पशुचिकित्सालयास भेट दिली. काकाणी पुढे बोलताना म्हणाले, तालुक्यामध्ये पाणी टंचाई भासू नये म्हणून हातपंप दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. विकासात्मक कामे करत असताना जी कामे अपुर्ण आहेत. ती ३१ मार्चपर्यंत पुर्ण करावीत. तसेच अखर्चिक निधी खर्च करा. कामे करत असताना गुणवत्तेचे पालन करा. दि. १९ मार्च २0१५ रोजी सुरक्षित पाणी स्त्रोत पाणी पुरवठा योजनेचे क्लोरीनेशन व साफसफाई, पाणी योजनेची योग्य देखभाल दुरुस्ती करणे व पाणी पट्टी वसुल करणे, दि. २0 मार्च रोजी चालू वर्षातील पाणीपुरवठा योजना सुरु असलेल्या गावांमध्ये लाल व पिवळे कार्डधारक ग्रामपंचायती फ्लोराईडदूषित गावांमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध योजनांचा आढावा घेण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत.
Post a Comment