0


दि.24:-  ( मुंबई )  एलईडी दिवे बसविण्यासाठी देशभरात हाती घेण्यात येत असलेल्या मोहिमेमुळे या दिव्यांच्या दरात मोठी कपात झाल्याचं केंद्रीय ऊर्जा आणि कोळसा मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. लिलावात एलईडी दिव्यांची किंमत 315 वरुन 204 त्यानंतर 149 नंतर 104 आणि अगदी अलिकडे या दिव्यांची किंमत 81.93  रुपयांपर्यंत कमी झाल्याचं त्यांनी सांगितले. रस्त्यावर हे दिवे लावल्याने उर्जेची 50 टक्के बचत होत असल्याने अनेक राज्यांकडून यासाठी मागणी असल्याचे गोयल म्हणाले. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणमसह सहा शहरात एलईडी पथदिवे बसविण्यात आल्यानंतर तिथले मुख्यमंत्री संपूर्ण राज्यातल्या रस्त्यांवर हे दिवे बसविण्यासाठी आग्रही आहेत.

मुंबईत येत्या दसऱ्यापर्यंत सर्वत्र एलईडी दिवे बसविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबई महानगरपालिकेची दरवर्षी 36 लाख रुपयांची बचत होते. संपूर्ण शहरात एलईडी दिवे आल्यास पालिकेची दरवर्षी 8 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेली चांगली कामगिरी जनतेसमोर आहे या सरकारने बहुमताच्या आधारावर कोळखा खाण (विशेष तरतुदी) विधेयक 2015 मंजूर केले आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. कोळसा खाणीचे वितरण वा लिलाव पारदर्शी व्हावा हे या विधेयकामागचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
----------------------------------------
----------------------------------------

Post a Comment

 
Top