मंगळवेढा / प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामपंचायत, सहकारी संस्था, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याचे संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक उद्योजक समाधान आवताडे यांनी 'पुण्य नगरी'शी बोलताना सांगितले. आवताडे म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे. त्याचबरोबर तालुक्यात पक्ष वाढीसाठी प्रय▪करणार आहे. तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत खा. शरद बनसोडे यांच्या माध्यमातून प्रश्नाची सोडवणूक करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खा. शरद बनसोडे यांच्या समोर तालुक्यातील जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले. त्यानुसार खा. बनसोडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाच्या पाणी योजनेसाठी निधी मिळण्यासाठी आवाज उठवला आहे. केंद्रात भाजप-सेनेचे सरकार असल्याने खा.शरद बनसोडे यांच्या माध्यमातून ३५ गाव पाणीपुरवठय़ासाठी केंद्रातून लवकरच निधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेमध्ये मोठे बदल घडत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याला खा. राहुल शेवाळे यांच्यासारखे युवक नेतृत्व संपर्कप्रमुख म्हणून नेमणूक केली असल्याने त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. मंगळवेढा तालुक्याचे राजकारण गेली ४0 वर्ष हे पाणी प्रश्नावरच होत आहे. या ४0 वर्षाचा इतिहास पाहिला तर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ४0 हजार मतदारांनी शिवसेनेला मतदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता पक्ष बळकटीकरणासाठी प्रय▪करणार आहे. तालुक्यात लवकरच युवा सेनेच्या नूतन पदाधिकार्यांची निवड होणार आहे. त्यामुळे पक्षाचे संघटन मजबुत होण्यासाठी व पक्ष वाढीसाठी जे तरूण प्रय▪करतील अशांना संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे शिवसेनेच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेवून काम करणार आहे. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने त्यांचे पंचनामे करून नुकसानबाधीत शेतकर्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment