सध्या सोशल मिडियामध्ये वेगवेगळ्या अँप्लीकेशनचे पेव फुटले आहे. या अँपद्वारे अनेकजण दूर असूनही जवळ आले आहेत. यामध्ये सध्या सार्वंच्या मोबाईलमध्ये सुरु असलेले व्हॉटस्अँप हे लोकप्रिय अँप आहे. या माध्यमाचा वापर हल्ली चांगल्या कामापेक्षा एखाद्याची बदनामी, अफवा पसविण्यासाठीच जास्त होत असल्याचे दिसत आहे. मात्र लक्ष्मीदहिवडी येथील शिक्षक भीमाशंकर तोडकरी यांनी 'गप्पा गोष्टी व चावडी' या नावाने ग्रुप सुरु करुन त्या ग्रुपमध्ये प्रतिष्ठित व्यक्ती शिक्षक, पत्रकार यांना सदस्य बनवू चांगल्या विचारांची देवाणघेवाण केली.ग्रुपमध्ये वर्गणी काढून शाळेला दिली पाण्याची टाकीगप्पा गोष्टी व चावळी या ग्रुपला ४४४ दिवस पूर्ण झाले म्हणून त्यांनी या ग्रुपकडून लक्ष्मी दहिवडी शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेविषयी चर्चा केली व पाण्याची टाकी शाळेला देण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला ग्रुपमधील सदस्यांनी पाठींबा दिला आणि लगेच ग्रुप सदस्यांनी वर्गणी गोळा करुन लक्ष्मीदहिवडी जि.प. शाळेला ५00 लि. पाण्याची टाकी भेट दिली. ग्रुप अँडमिन भीमाशंकर तोडकरीयांनी व्हॉटस् अँपच्या माध्यमातून सत्यात उतरविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाण्याची टाकी शाळेला देण्याचा कार्यक्रमाला ग्रुपमधील सदस्य शिवानंद पाटील, नागेश स्वामी, पिंटू स्वामी, सावता बनसोडे, सुनील गोडसे, शरद गुंजगावकर उपस्थित होते. या सर्व सदस्याचे लक्ष्मीदहिवडी प्राथमिक शाळेकडून अभिनंदन करण्यात आले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment