0

मुंबई: दूध उत्पादक शेतकऱ्यांना किमान 20 रुपये प्रतिलिटर दर मिळावा. त्यापेक्षा कमी दरानं दूध खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसेंनी दिला आहे. तसंच यासंदर्भात उद्याच अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी आज मुंबईत बैठक झाली. यामध्ये किमान 20 रुपये प्रतिलिटरचा शासकीय भाव ठरवण्यात आला. तसेच 20 रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास फौजदारी कारवाई अध्यादेश काढण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासंबंध प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सभापतींकडे या संदर्भात आज बैठक झाली. सध्या हा कायदा अस्तित्वात नाही आणि मुख्यमंत्री देखील परदेश दौऱ्यावर असल्याने तूर्तास याबाबत अध्यादेश काढण्यात येणार आहे. तसेच हा कायदा लवकरच अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही खडसेंनी सांगितले.

Post a Comment

 
Top