बारवर छापा मारल्याचा राग
----------------------------------------
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातले काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या भावाने तहसीलदारांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. बारवर छापा मारल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.
दुधनी गावातल्या शांभवी बारवर पहाटे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी छापा मारला. हा बार आ. सिद्धराम म्हेत्रे यांचे भाऊ शंकर म्हेत्रे यांच्या मालकीचा आहे. छापा मारण्यासाठी तिथे आल्यावर शंकर म्हेत्रे यांनी तहसीलदारांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
शंकर म्हेत्रे यांच्याविरोधात अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी तहसीलदारांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.सध्या तहसीलदार गुरू बिराजदार यांच्यावर सोलापुरातील आश्विनी रूग्णालयात अतिदक्षता विभात उपचार सुरू आहे.सकाळी ते सोलापूर शासकीय रूग्णालयात डिस्चार्ज घेवुन पुढील उपचारासाठी आश्विनी रूग्णालयात दाखल झाले आहेत.सकाळपासुन प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी रूग्णालयाल भेटी दिल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment