0

भंडीशेगावच्या आठ दिवसापासून बेपत्ता तरूणाचा मृतदेह वाखरी पालखी तळावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला... सदर तरूणाचे गावातील एका मुलीशी होते प्रेसंबंध... दोघा प्रेमीयुगूलास करायचे होते लग्न.. मात्र कुटूंबाचा होता लग्नास विरोध..

- दि.26 जुन 2015 पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगावच्या एका तरूणाचा मृतदेह वाखरी शिवारात पालखी तळावरील लिंबाचे झाडास दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आज रोजी सकाळी आढळुन आला. या तरूणाचे घरच्यांचा प्रेसंबंधातील विवाहास असलेल्या विरोधामुळे हा तरूण गेल्या आठ दिवसापासून घरातुन निघुन गेला होता. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की भंडीशेगाव येथील योगेश तुकाराम जाधव (वय-25) या तरूणाचे गावातीलच एका मुलीशी प्रेसंबंध होते. या दोन प्रेमीयुगुलास लग्न करून संसार थाटायचा होता मात्र कुटूंबाचा यांच्या लग्नास विरोध होता. यामुळे गेल्या आठ दिवसापासुन योगेश घरातुन निघुन गेला होता. घरातील लोक त्याचा शोध घेत होते. आज सकाळी योगेश चा मृतदेह वाखरी शिवारातील पालखी तळावरील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला. याबाबतची माहिती मयत योगेश चा भाऊ संदीप तुकाराम जाधव याने पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात आज सकाळी 7 वा. दिली आहे. या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात रजिस्टर झाली असुन पुढील तपास ए.एस.आय. श्री ननवरे हे करत आहेत.

Post a Comment

 
Top