0
 मंगळवेढा तालुक्याच्या काही भागात यंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीस पावसाने बर्‍यापैकी सुरुवात केल्याने काही ठिकाणी कांदा पेरणीस सुरुवात झाली आहे. एकरी अडीच ते तीन हजार रुपये दराने माणसांच्या सहाय्याने लक्ष्मीदहिवडी परिसरात कांदा पेरणी सुरु झाली आहे. गेली दोन वर्षे मृग नक्षत्राच्या पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. पण यंदा थोड्या प्रमाणात का होईना पण पाऊस झाल्याने कांदा, मका, बाजरी पेरणीच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. पण या आठवड्यात पावसाने ओढ दिली असल्याने शेतकर्‍यांची चिंता थोडीशी वाढली आहे. गेल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर अनेकांनी लगेच कांद्याची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने कांद्याच्या उगवणीवर परिणाम होण्याची चिंता शेतकर्‍यांना वाटू लागली आहे. मात्र यंदा मृग नक्षत्रात पाऊस सुरु झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीची शाश्‍वती वाढली आहे. खरीपाच्या पेरणीची पूर्ण तयारी शेतकर्‍यांनी करुन ठेवली आहे. व्यवस्थित पाऊस पडला तर सुमारे एकवीस हजार हेक्टरवर खरीपाची होणार आहे. त्यामुळे सध्या एका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरीराजा आहे.

Post a Comment

 
Top