0

मुलांच्या शोधात शिक्षक दारोदारी

नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. चोहीकडे पाठीवर दप्तर घेवून शाळेला निघालेली लहान-मोठी मुलं दिसत आहे. परंतु, काही शाळांचे शिक्षक हे पालकांच्या दारोदारी फिरताना दिसत आहेत. अनेक शाळांचा पट कमी झाल्यामुळे 'आमच्या शाळेला मुलं देता का मुलं' म्हणत शिक्षक पालकांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत.आज ग्रामीण भागातही जिल्हा परिषदेच्या शाळेपेक्षा खाजगी इंग्लिश मिडीयमच्या शाळांकडे पालकांचा अधिक कल असल्याचे चित्र आहे. खाजगी शाळांचे नियोजन, मार्केटींग, टापटीप, मुलांना प्रवासाची सोय यामुळे पालकांसह मुलांचाही ओढा अशा शाळांकडे अधिक आहे. जि.प.च्या अनेक शाळांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात. अनेक शाळांमध्ये उत्कृष्ट शिक्षण दिले जाते. परंतु, याचे मार्केटींग करण्यात त्या शाळा कमी पडताना दिसत आहेत. त्यात अनेक जि.प. च्या शिक्षकांचा गावातील राजकारणातील वाढता रस व शाळेकडील दुर्लक्ष याचाही फटका जि.प. शाळांना बसत आहे. अनेक शिक्षकांनी घरच्यांच्या नावे नानाविध उद्योग सुरू केल्याचाही तोटा शाळांना होत आहे. अशा पुरिस्थितीत आजचा पालक खाजगी शाळांकडे वळल्याचे चित्र आहे. परिणामी जि.प.च्या अनेक शाळांचे शिक्षक आज पालकांच्या दारोदारी विद्यार्थ्यांच्या शोधात फिरताना दिसत आहेत.

Post a Comment

 
Top