0
तापमान वाढल्याने मिरचीची रोपे जळाली
 अनेक शेतकर्‍यांवर दुबार लागवडीची वेळ

लक्ष्मीदहिवडी / दत्तात्रय नवत्रे

 सध्या महाराष्ट्रभर मंगळवेढय़ातील शेडनेट पॅटर्न गाजत आहे, पण उन्हाच्या तीव्रतेने मार्च-एप्रिल महिन्यात लागवड केलेली ढोबळी मिरची धोक्यात आली असून अनेक शेतकर्‍यांचे पीक वाया गेले आहे.उन्हामुळे मिरचीची रोपे जळाल्याने शेतकर्‍यांचे हजारो रूपयाचे नुकसान झाले असून दुबार लागवडीची वेळ आली आहे.हजारो रूपयाचे नुकसानतालुक्यात आतापर्यंत १५७ शेडनेट हाऊस झाली आहेत. यामधील २0 शेडनेट गतवर्षी झाली होती. त्यातील काही शेतकर्‍यांनी ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतल्याने इतरही शेतकर्‍यांनी बँकांची कज्रे काढून शेडनेट उभा केली व मिरचीची लागण केली आहे. मात्र, दिवसेंदिवस तापमान वाढत गेल्याने अनेक रोपांनी माना टाकल्या तर काही रोपे जागेवरच जळून गेली आहेत. लाखो रूपयाचा खर्च करून शेडनेट उभा केले, उत्साहाने मिरची लावली, मात्र पहिल्याच घासाला खडा लागल्याने शेतकरी खचून गेले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने लागण केलेली काही शेतकर्‍यांची पूर्ण रोपे जळाली आहेत. उन्हाच्या तीव्रतेपासून रोपांचा बचाव करण्यासाठी व रोप जगविण्यासाठी शेतकर्‍यांनी दुकानदार देईल ते औषध आणून फवारणी केली. ड्रिपमधून सोडले पण तापमानापुढे सर्व हतबल झाले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी चार-चार वेळा रोपे आणून फेरलागवड केली आहे. तरीही रोपांची मर सुरूच असून मोठा पाऊस पडल्याशिवाय रोपांची मर थांबणार नाही असे जाणकारातून सांगण्यात येत आहे. मात्र, आर्थिक संकटात सापडलेला नवीन शेडनेट शेतकरी कुठून दुबरुद्धी सुचली आणि शेडनेट केले, म्हणून हतबल झाला आहे.

Post a Comment

 
Top