मोटारसायकल स्वारास शिवीगाळ करीत ठेवला डोक्यावर पाय
मंगळवेढा / प्रतिनिधी शहरात मोटारसायकलवर कारवाई करण्याची मोहीम मोठय़ा प्रमाणात चालू असताना ड्रीपलसीट आल्याचे कारण सांगत मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकार्यांनी शिवराळ भाषेत शिवीगाळ करत मारहाण करीत चक्क मोटारसायकल स्वाराला खाली पाडून डोक्यावर बुटासहित पाय देत लाथा घातल्याचा प्रकार बोराळे नाका येथे घडला. त्यामुळे पोलिसांच्या दादागिरी विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी विनालायसन्स, ड्रीपलसीट, नो-पार्किंग, फॅन्सी नंबर प्लेट आदी कारणामुळे मोटारसायकलवर कारवाई करण्यात येत आहे. शनिवार दि. १२ रोजी सकाळी शहरातील बोराळे नाका परिसरात पोलीस कारवाई करीत होते. तेव्हा डोंगरगाव येथील एक तरूण ड्रीपलसीट आला असता. या कारवाईच्या मोहीमेवर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी विभुते, प्रकाश उमाप हे होते. तेव्हा या दोघांनी त्या मोटारसायकल स्वारास शिवराळ भाषेत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्या तरूणाला खाली पाडत डोक्यावर पाय ठेवला. तेव्हा हा सर्व प्रकार एका व्हीडीओ शुटींगमध्ये चित्रीकरण करण्यात आले. सर्व प्रकार पाहून नागरिक भयभीत झाले असून ज्यांच्याकडून कायद्याची अपेक्षा केली जाते. त्यांच्याकडून कायदा धाब्यावर बसवत असल्याचा किळसवाणा प्रकाराची चर्चा दिवसभर होत होती. कायद्याचे रक्षक हे भक्षक बनले असून खाकी वर्दीच्या नावाखाली दादागिरी करणार्या या दोन पोलीस निरीक्षकांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज दि. १३ रोजी इलेक्ट्रीनिक मिडियाने ही गोष्ट उचलून धरल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राकडून पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांना लेखी म्हणणे मागतिले आहे. दिवसभर सोशल मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडियावर व्हिडीओ झळकत असल्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. दादागिरी करणार्या या दोन पोलीस निरीक्षकांवर काय कारवाई होते? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथे मोटारसायकलस्वार मारहाणीबाबत पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या आदेशानुसार शिवाजी विभुते व प्रकाश उमाप यांना याबाबत लेखी म्हणणे मागितले आहे. - किशोर करांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी.
Post a Comment