अर्ज भरण्यास प्रारंभ
मंगळवेढा तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व एका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ झाला असून गावोगावी वातावरण चांगलेच तापत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये आ. भालके, आवताडे व परिचारक अशा तीन गटांमध्ये निवडणुका होणार असून निवडणुकींना चांगलीच रंगत येण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोमवार दि. १३ पासून २0 जुलै पर्यंत अर्ज भरण्यात येणार आहेत. २१ जुलैला अर्जाची छाननी करण्यात येणार आहे तर २३ जुलैला अर्ज माघार घेणे व चिन्ह वाटप होणार आहे. दि. ४ ऑगस्ट रोजी मतदान व दि. ६ ऑगस्टला मतमोजणी करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच ग्रामपंचायतींचे अर्ज हे ऑनलाईन भरण्यात येणार आहेत. तालुक्यात विधानसभा निवडणुकीपासून आ. भारत भालके, समाधान आवताडे व प्रशांत परिचारक हे तीन गट राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे तिन्हीही नेते गावात आपापला गट मजबूत बांधणी करण्यासाठी कसोटीने प्रय▪करीत आहेत. निवडणूक होणार्या ग्रामपंचायती व मतदान डोणज २८0६, कचरेवाडी २0४६, लेंडवेचिंचाळे १९१९, मल्लेवाडी ८३३, घरनिंकी १२७४, महमदाबाद (शे) ६६४, सलगर बुद्रूक ३१२२, लवंगी २0७0, भोसे ४७४१, बोराळे ३६२५, अरळी १९२८, तांडोर ८७३, लमाणतांडा १३३५, कात्राळ-कर्जाळ १३३५ या १५ ग्रामपंचायती व गुंजेगावच्या एका जागेची पोटनिवडणूक होणार आहे.
Post a Comment