0

'व्हॉटस् अँप'चा प्रचारासाठी होतोय वापर
ग्रुपमध्ये चुटकूले, कविता व वातट्रिकांमधून होतेय मनोरंजन व प्रचार

लक्ष्मीदहिवडी / दत्तात्रय नवत्रे
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धूम जोरात सुरू असून वेगवेगळ्या पद्धतीने मतदार राजाला आपल्याकडे वळविण्याचा उमेदवार प्रय▪करीत आहेत. या प्रचार यंत्रणेमध्ये यंदाच्या निवडणुकीत 'सोशल मिडिया'चा मोठा वाटा दिसत असून याद्वारे प्रचार होत आहे. व्हॉटस् अँप ग्रुपद्वारे अनेकजण ग्रामपंचायत निवडणुकीवर चुटकूले, कविता, वातट्रिका करीत असल्याने प्रचाराबरोबरच मनोरंजनही होत आहे. चौकातून एखाद्या वयस्कर व्यक्तीला घरी सोडायला गेलो तरी लोकं म्हत्यांत पोरगं ग्रामपंचायतीच्या प्रचाराला लागलं, जर रात्री बेरात्री कोणी पांढरे कपडे घालून तुमचे पाय धरले तर भूत समजून घाबरू नका, तो ग्रामपंचायत उमेदवारही असू शकतो, घराघरात, बापलेकात, भावा-भावात, भावभावकीत, नात्यागोत्यात, गल्ली-गल्लीत तंटे लावण्याचा सरकारी कार्यक्रम म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक अशा एक ना अनेक वातट्रिकांसह तरूणांकडून आपले चिन्ह, कामाचे ध्येय याबाबत माहिती पाठवून व्हॉटस् अँपद्वारे प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे. घरोघरी प्रचाराबरोबर सध्या व्हॉटस् अँप चॅटींगद्वारेही मेसेज करून मतदारांना वळविण्याचा प्रय▪होताना दिसत आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत तरूणांची संख्या अधिक दिसत आहे. सध्या ऑनलाईनच्या जमान्यात गावचे कारभारीही ऑनलाईन राहणारेच हवेत तरच गावच्या विकासाला हातभार लागणार आहे. पण मतदारांनी उमेदवार निवडताना निस्वार्थी, निर्व्यसनी, निरपेक्ष, जातभेद न करणाराच निवडून देणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरचा कारभारी प्रामाणिक असला तरच घर व्यवस्थित चालते, त्याप्रमाणे गावचे कारभारीही प्रामाणिक असावेत, अवैध व्यवसाय करणार्‍यांना मतदारांनी घरी बसवावे. निवडणूक ही तात्पुरती आहे, आपले ऋणानुंबध व स्नेह कायम ठेवा निवडणुकीचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ देऊ नका, ही विनंती. असे अनेक मेसेज सोशल मिडियावर झळकत आहेत.

Post a Comment

 
Top