0

लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने चारा छावण्या व पाण्याचे टँकर सुरू करावेत अन्यथा जनावरे तहसील कार्यालयासमोर बांधून घागर मोर्चा काढू, असा इशारा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पप्पू स्वामी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी औदुंबर वाडदेकर, संजय माळी, विष्णू मासाळ, विठ्ठल पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ३५ गावच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिक पाच-दहा किलोमीटरवरून वाहनाद्वारे पाणी आणत आहेत. अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. प्रशासनाने दखल घेऊन लवकरात चारा छावण्या व टँकर सुरू करावेत अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

Post a Comment

 
Top