0

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातून १५९ संस्थेतून ठराव देण्यात आले होते. त्यातून ६ ठराव अपात्र झाले आहेत. त्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातून सर्वांत मोठी संस्था असलेली श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा ठराव थकबाकीदार संस्था असल्यामुळे अपात्र झाला आहे. दि. ५ सप्टेंबर २0१२ अखेर जिल्हा बँकेस संलग्न असलेल्या खरेदी-विक्री संघ, सहकारी साखर कारखाने, ऑईल मिल्स, सूतगिरण्या, शेती प्रक्रीया संस्था वर्ग क्र. क मधून मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघ, कृषी उद्योग संघ, शांतीसागर डाळ उत्पादक संस्था, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील फळ उत्पादक संस्था, मंगळवेढा तालुका सूतगिरणी इत्यादी सहकारी संस्थेचे अर्ज मंजूर करण्यात आली आहेत. यामधून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यातून दिलेला धनंजय दादासाहेब पाटील यांचा अर्ज कारखाना थकबाकीदार संस्था असल्याने अपात्र करण्यात आला आहे. त्याचबरोबर मंगळवेढा ग्रामीण सहकारी औद्योगिक तेल उत्पादक संस्थेकडून नागन्नाथ दगडू राऊत यांचा अर्ज संस्था अवसायनात असल्यामुळे अपात्र केला आहे. दि. ५ सप्टेंबर २0१२ अखेर बँकेशी संलग्न असलेल्या २४ संस्थांचा ठराव पात्र झाला असून त्यामधून जालिहाळ येथील विठ्ठल दूध संस्थेकडून दिलेला लक्ष्मण कोळी तसेच भाळवणी येथून बाळकृष्ण दूध उत्पादक संस्थेच्या हौसाप्पा शेंबडे यांचा व पडोळकरवाडी येथील बसवेश्‍वर दूध संस्थेच्या रघुनाथ पडोळकर या तिघांचा ठराव संस्था अवसायनात असल्यांमुळे अपात्र केला आहे. दि. ५ सप्टेंबर २0१२ अखेर बँकेचे संलग्न असलेल्या नागरी सहकारी बँका, पतसंस्था, ग्रामीण पतसंस्था, नोकरदारांच्या पतसंस्था, पाणीपुरवठा, औद्योगिक तसेच ज्याचा समावेश इतर मतदारसंघात नाही अशा संस्थेमार्फत तालुक्यातून ४२ ठराव पात्र झाले आहेत. तसेच विकास सेवा संस्थेतील ७९ संस्थेपैकी १ संस्था असलेल्या आंधळगाव येथील विकास सेवा संस्थेतील दिलेला दत्तात्रय संभाजी भाकरे यांचा ठराव अपात्र झाला आहे. तसेच ग्रामोद्धारक विकास संस्था, नवनाथ सूर्यवंशीवाडी विकास सेवा व खवे विविध विकास सेवा तसेच दत्त विकास सेवा संस्था या चार संस्थेचा ठराव अप्राप्त झाला आहे.

Post a Comment

 
Top