मार्गावर नाकाबंदी करून तपासणी होणे गरजेचे
मंगळवेढा / प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत असल्याने राज्यात गुटखा बंदी केली. पण गुटखा विक्रत्यांनी यातून मार्ग काढत मंगळवेढा मार्ग काढत महाराष्ट्रामध्ये गुटखा आणण्यासाठी मंगळवेढयाचा वापर करत असल्याचे स्पष्ट होत आहे.मंगळवेढा पोलीसांकडून याची कडक तपासणी होत नसल्यामुळे गुटख्याचा माल आरामामध्ये येवू लागले आहे.
मंगळवेढा तालुका हा कर्नाटक सीमेवर आहे. कर्नाटक राज्यात गुटखा खुलेआम विक्री केली जाते. त्यामुळे या भागातून गुटखा मोठय़ा प्रमाणावर महाराष्टात येत आहे. मंथली गोळा करून गुटखाच्या गाड्या मोठय़ा प्रमाणावर सोडल्या जात असल्याची परिसरामध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा होत असून यासाठी एका पोलिसानी झिरो पोलिसांची नेमणूक केली असल्याचे बोलले जात आहे. बोराळे व हुलजंती बीट या भागात झिरो पोलिसांचा राबता वाढला आहे. झिरो पोलीसांकडून कर्नाटकातून येणार्या गाड्या सीमेवर अडवून मंथली गोळा करीत आहे. ही गोळा केलेली माया वरिष्ठ अधिकार्यापर्यत पोहचविली जात असल्याचे बोलले जात आहे. पोलीस ठाण्यामध्ये गुप्त माहिती मिळविण्यासाठी डी.बी. पथकाची नेमणूक केली जाते. पंरतु मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पथकांने आतापर्यंत किती गुन्ह्याचा शोध लावला हा विषयही संशोधनाचा ठरत आहे. यापूर्वी सिद्धापूर येथे दोन लाख रुपयाचा गुटखा पकडण्यात आला होता पण तेव्हाही हे प्रकारण बाहेरच मिटवण्यात आल्याची चर्चा होत आहे.
अवैद्य गुटखा मंगळवेढा मार्ग महाराष्ट्रामध्ये येत असल्याचे आता स्पष्ट होवू लागले असून यामुळे एक प्रकार शासनाच्या नियमालाच हरताळ फासण्यासारखा प्रकार होवू लागला आहे. संबंधित यंत्रणेकडून यावर कडक कारवाई होत नसल्यामुळे यातील गुन्हेगार ही मोकाट राहत आहेत. यामुळे गुटखा चोरून महाराष्ट्रामध्ये येवू नये यासाठी नाकाबंदी करून चौकशी करणे आवश्यक आहे. याबाबत तातडीने पाउले उचलल्यास पायबंद बसणार आहे.
Post a Comment