0

११ गावांचा निर्णय नाही

२५५ कोटी मिळणार

: १८.२४ लाख ब्रास वाळूचा होणार लिलाव

सोलापूर: जिल्ह्यातील भीमा, माण आणि नीरा नदीवर विविध ४३ ठिकाणी वाळू उपसा करण्यास शासनाच्या पर्यावरण खात्याने मंजुरी दिली आहे. एकूण १८ लाख २४ हजार ब्रास वाळूचा लिलाव काढण्यात येणार असून यातून २५५ कोटींचा महसूल मिळेल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. वाळू ठेक्यांना १४00 रुपये प्रतिब्रास असा दर निश्‍चित केला आहे. तालुके आणि त्या गावात वाळू ब्रासचे काढलेले ठेके- दक्षिण सोलापूर: कारकल (५२५९२ ब्रास), कुडल (३९४४६ ), हत्तरसंग (३९४४६), सिद्धापूर-खानापूर (८१११३ ), तेलगाव अरळी (७२३२१) पंढरपूर: अजनसोंड-चळे (९५११७), अजनसोंड-मुंढेवाडी (८२३५५), तारापूर-चळे (८१0११), खरसोळी-चळे (८७५३0), खरसोळी-आंबे (७९0८२), पुळूज-सरकोली (७८५७९), आंबेचिंचोली-सरकोली (९८६१३), देगाव-मुंढेवाडी (१0४१३0), व्होळे-कौठाळी (४३२३५),खेळभाळवणी-खेडभोसे (४४७0५), मारापूर-तावशी (१८0९१) माळशिरस: सापटणे-कोंढारपट्टा (२७६१२), बादलकोट-कोंढारपट्टा (२९४५२), कान्हापुरी-वाघोली (२६७३९), करोळे-लवंगी (२५३८३) हे ठेके पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात येतात. माढा: गारअकोले (१६९७0), शेवरे (२00४६), मिटकलवाडी-बाभूळगाव (४९२७४), वाफेगाव-बेंबळे (३२५५६) करमाळा: जिंती (३६१८२), रामवाडी (५७६९७), तरटगाव (१३३८१), अलीजापूर (३0७0), बिटरगाव (४५२४), बाळेवाडी (३३६३), बोरगाव-निलज (११७६३), करंजे-बाळेवाडी (७३७२) सांगोला: वाढेगाव (११९९७), नवी लोटेवाडी (१५९३१), खवासपूर (२२२६१), मेथवडे (३४३७0), सावे-बामणी (३६८९0), देवाळे (१८४0५), जवळा (१३८७१), यलमार मंगेवाडी (१0९0७), वटंबरे (१३३७७) मोहोळ-मंगळवेढा: घोडेश्‍वर-तामदर्डी-माचणूर (११६९२४), गुंजेगाव (१६६९४), माळेवाडी (६0८६), ढवळस (८४१३), धरमगाव (९९८२), मुढवी (८६२७). (प्रतिनिधी) ११ गावांचा निर्णय नाही र८ेु'>च्/र८ेु'>दक्षिण सोलापुरातील ५ आणि अक्कलकोटमधील ६ असे ११ ठेके हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहेत. त्यामुळे त्यांचा अद्याप निर्णय झाला नाही. देवीकवठे, खानापूर, अंकलगी, धारसंग, शेगाव म्हैसलगी (अक्कलकोट), लवंगी, औज, कुरघोट, चिंचपूर, टाकळी (द. सोलापूर) या ठिकाणचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे गौण खनिज कार्यालयाकडून सांगण्यात आले.

४३ ठिकाणी वाळू उपसा करण्यास पर्यावरण खात्याने मंजुरी दिली आहे. लवकरच जाहीर प्रसिद्धीकरण करून निविदा मागविल्या जातील. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ११ ठिकाणच्या ठेक्यांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. - तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी

Post a Comment

 
Top