मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी विकास सेवा सोसायटीची निवड बिनविरोध झाली असून चेअरमनपदी सोमा मारूती पाटील तर व्हा. चेअरमनपदी कमळसिद्ध भगवान श्रीराम यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी. लिंबोळे यांनी केली.
लक्ष्मीदहिवडी या गावात दोन सोसायट्या कार्यरत असून, या अगोदरच्या लक्ष्मीदेवी विकास सोसायटीवरही आवताडे गटाने बिनविरोध वर्चस्व राखले आहे. दोन्हीही सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून दोन्हीही सोसायट्या आवताडे गटाकडेच आहेत. लक्ष्मीदहिवडी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी राजकुमार मेतकुटे, दत्तात्रय बनसोडे, सुरेश पाटील, मच्छिंद्र सरगर, प्रकाश जुंदळे, राजू बोबलादे, राजू जालगिरे, सागर साळे, दत्तात्रय तोडकरी, नंदिनी पाटील, सुजाता शिंगाडे यांनी बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पं.स. सदस्य संजय पवार, धनंजय पाटील, विलास पाटील, दिलीप राजमाने, गंगाधर मसरे, विजय जालगिरे, कुमार पाटील, बसवेश्वर तोडकरी, लक्ष्मण जुंदळे, शिवशंकर जुंदळे, मारूती जुंदळे, सुरेश जुंदळे, दगडू बनसोडे, अंकुश बनसोडे, नवनाथ बनसोडे, बजरंग शिंगाडे, बाळासाहेब मेटकरी, मारूती काळे, कुमार बुरूंगले, शहाजी सोनवले, लाला सोनवले, राजकुमार कोष्टी, मच्छिंद्र बनसोडे, भारत आदलिंगे, इराप्पा शेजाळ, दत्तात्रय श्रीराम, युसूफ शेख, मोहन लिगाडे आदींनी प्रय▪केले.
नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे बबनराव आवताडे, समाधान आवताडे, विष्णुपंत आवताडे, सिद्धेश्वर आवताडे यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment