आळंदी
पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर आळंदी
हे लहानसे गाव आहे. इंद्रायणी नदीच्या
काठावर असलेले संत ज्ञानेश्र्वरांच्या संजीवन
समाधीचे हे ठिकाण! यामुळेच आळंदीला
तीर्थक्षेत्राचे महत्त्व आले आहे. आषाढ महिन्यात संत
ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून
पंढरपूरला जाते. त्यात असंख्य वारकरी सामील
होतात. आळंदी ते पंढरपूर हे अंतर (सुमारे २०५ कि.
मी.) भाविक विठू माउलीच्या नामाचा गजर करत,
ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करत, चालत पार
करतात.
आळंदी गावात संजीवन
समाधीसह, मुक्ताईचे मंदिर, विठोबा-रखुमाई मंदिर व
कृष्णमंदिरही पाहण्याजोगे आहे. आळंदी येथे
अजानवृक्षाखाली संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी
जिवंत समाधी घेतली म्हणूनच या स्थानास
संजीवन समाधी म्हटले जाते.
कीर्तन-प्रवचन-वेदाभ्यास यासाठीचे
महाविद्यालय येथे आहे. संस्कृत व अन्य धार्मिक ग्रंथांचा अभ्यास तेथे
अविरत सुरू असतो.
.............
Post a Comment