0

पंढरीत एकजण पोलिसांच्या ताब्यात
पंढरपूर / शहर प्रतिनिधी
बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईलचे सीमकार्ड घेऊन वापर करणार्‍या राजस्थानच्या व्यक्तीविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २७) करण्यात आली. मनोजकुमार विनोदकुमार नट (रा. दादर्डा, ता. किसनगड, राजस्थान) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नांव आहे. नट हा व्यवसायानिमित्त पंढरपुरात आला असून सध्या तो पद्मावती उद्यानासमोर राहतो. दरम्यान, त्याने पनवेल येथील विक्रम संपत या व्यक्तीच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून आयडीया कंपनीचे सीमकार्ड (८१0८९९५३२७) घेतले. शहर पोलिसांनी अधिक चौकशीसाठी सोलापूर येथील गुन्हे शाखेकडून माहिती घेतल्यानंतर सदरचे सीमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून मिळवून वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी नट याला अटक केली आहे. अधिक तपास हवालदार पटेल हे करीत आहेत. शहर पोलीस ठाण्यात 'एटीएस' पथकाची स्थापना करण्यात आली असून परराज्यातून येथे येणार्‍या लोकांची चौकशी करून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही या पथकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड मिळविणार्‍यांची माहिती घेऊन त्याचा नेमका कोणत्या कारणासाठी वापर करण्यात आला, याची खातरजमा करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे.

Post a Comment

 
Top