0

सोलापूर / प्रतिनिधी
उत्सव काळात मिष्ठान्नाची मागणी मोठय़ाप्रमाणात वाढत असते. दुधापासून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्यासाठी सर्वत्र दुधाला मोठय़ाप्रमाणात मागणी असते. दिवाळीनिमित्त शहर जिल्ह्यात सर्वत्र दुधाला मागणी वाढली आहे. त्यामुळे दुध विक्रे त्यांकडून दुधाची चढय़ा दराने विक्र ी होताना दिसून येत आहे. त्यामुळे दुध विक्रे त्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचे दिसते. बदलत्या जीवणशैलीत घरोघरी दिवाळीचे पदार्थ बनविण्याची प्रथा काही प्रमाणात मागे पडत आहे. मोठय़ा शहरापर्यंत र्मयादित असलेले हे लोण आता लहान शहरांपर्यंतही पोचत आहे. बाहेरुन मिठाई मागविली जात आहे. मिठाई बनविण्यासाठी व्यावसायिकांना दुधाची मोठय़ा प्रमाणात गरज भासते. याकरिता बाहेरील जिल्ह्यातून दुधाची आवक करण्यात आली असून कच्च्या दुधाची अधिक दराने विक्र ी होताना सर्वत्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातून शहरातील बाजारपेठेत दुधाची आवक होते. उत्सवकाळात दूध उपलब्ध होत नसल्याने दुधाची खरेदी नागरिक नाईलाजस्तव चढय़ा दराने करीत आहेत. दुग्धजन्य पदार्थापासून निर्मित मिठाईला विशेष मागणी असल्याने हल्ली दूध विक्रे त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. कोजागरीपासून दुधाची मागणी वाढते. कोजागरी सणाला दुधाची विक्र मी मागणी असते. त्यानंतर दिवाळीनिमित्त पुन्हा दुधाची मागणी वाढल्याने जिल्ह्यात दुधाची कमतरता काही प्रमाणात जाणवत आहे. दूध टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बाहेरील जिल्ह्यांतूनही दुधाची आवक होताना दिसून येत आहे. दुधाला प्रचंड मागणी वाढल्याने अधिक नफा मिळविण्यासाठी दुधात मोठय़ाप्रमाणात भेसळ केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

 
Top