0

' मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत मला सुमारे ४१ हजार जनतेने मतदान केले. माझ्या पहिल्याच प्रयत्नात मला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. मिळालेल्या प्रतिसादाने मी समाधानी आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील जनतेला व मतदार संघातील जनतेला आत्तापर्यंत केवळ आश्‍वासने मिळत होती. आश्‍वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. जनतेला याबाबत बदल हवा होता. मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याची धमक असणारे नेतृत्व हवे होते. आत्तापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत आश्‍वासने दिली पण पाळली नाहीत. म्हणून मी माझा चांगला असलेला उदय़ोग व्यवसाय सोडला व जनतेसाठी राजकारणात येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पराभवाने मी व माझे कार्यकर्ते अजिबात खचलो नाही. पंढरपूरमध्ये आम्ही प्रय▪केला. जनतेपर्यंत पोहचलो. परंतू आमच्या कार्यकर्त्यांना याठिकाणी जनतेचा विश्‍वास संपादन करण्यात यश मिळाले नाही. याबरोबर मंगळवेढय़ातील जनतेने आपला उमेदवार म्हणून मला अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या या विश्‍वासाला तडा जाणार नाही असे कोणतेही कृत्य माझ्या हातून घडणार नाही. यापुढील काळात मतदारसंघाची सेवा करणे, जनतेचे प्रश्न समजून घेऊन सोडवणूक करण्यासाठी प्रय▪करणे, दोन्ही तालुक्यात विकासकामासाठी लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी यापुढील काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे आवताडे यांनी सांगितले.      

Post a Comment

 
Top