0

लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
    मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गाव एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून या गावाकडे पाहिले जायचे पण गतवर्षी झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हातून सत्ता हिसकावून घेऊन आ. भालके गटाने ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांना गावातून तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाल्याने या गावाविषयी आ. भालकेंना आत्मपरिक्षन करण्याची वेळ आली आहे. या गावाला आ. भालके यांनी तिर्थक्षेत्राचा निधी मिळवून दिला. कोरडवाहू अभियानात गावाचा समावेश केला. आमदार फंडातून सभामंडप, साठवण तलावाचे काम पूर्णत्वास नेले, अशा एक ना अनेक योजनांतून गावाला कोट्यवधीचा निधी दिला असतानाही या गावातील मतदारांनी आ. भालकेंना का नाकारले? याचे चिंतन करण्याची गरज आहे. या गावातून 'स्वाभिमानी'चे प्रशांत परिचारक यांना १३९९, शिवसेनेचे समाधान आवताडेंना ९५४ तर आ. भालकेंना ८३२ मते मिळाली. त्यामुळे येथील मतदारांनी आपल्याविषयी नाराजी का दर्शविली हे जाणून घेणे गरजेचे आहे. येथील आ. भालके गटाचे खंदे सर्मथक कार्यकर्त्यांसह निवडणुकीआधी परिचारक गटात गेले आहेत. भर सभेत एखाद्याने अडचण मांडली तर त्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, समाधानकारक उत्तर देणे गरजेचे आहे. परंतु, आ. भालके यांच्या आक्रमक स्वभावामुळे मतदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.      

Post a Comment

 
Top