अनेकदा डाळिंबास कितव्या वर्षी फळे धरावीत हे शेतकर्यांना माहित नसते. लागवडीनंतर पहिल्या २-३ वर्षात झाडांची वाढ चांगली होण्याच्या या कळात बहार धरून नये. झाडावर येणारी फळे काढून टाकावीत. डाळींबास आपल्या हवामनात वर्षभर फुले येतात. जानेवारी, जून व ऑक्टोबर महिन्यात फले लागण्याचे प्रमाण जास्त असते. जानेवारी महिन्यात लागणार्या फुलांना आंबे बहार म्हणतात, तर जूनमध्ये लागणार्या फुलांना मृग बहार म्हणतात आणि ऑक्टोबरमध्ये लागणार्या फुलांना हस्त बहार असे म्हणतात. कारण त्यावेळी पावसाचे हस्त नक्षत्र असते. योग्य डाळिंब उत्पादनासाठी त्याचा बहार धरणे ही क्रिया फार महत्त्वाची असते. डाळिंबाची फुले ही मागील हंगामातील पक्व काडीवर येतात. या काडीचे पोषण व्यवस्थत होणे गरजेचे असते. या फुटीवरील पाने अन्न तयार करुन काडीत साठवतात. नवीन फुटीचे ३ प्रकार पडतात. अन्न तयार करुन काडीत साठवतात. नवीन फुटीचे ३ प्रकार पडतात. एक पालवीसह फुले येणे, दुसरी नुसती फुले येणे आणि तिसरी नुसती पालवी येणे होय. म्हणजेच काडीमध्ये अन्नसाठा म्हणजेच फुले नसतात आणि असली तरी खूप कमी असतात. काडीमध्ये अन्नसाठा मध्यम स्वरुपाचा असेल तर पालवी व फुले सारख्या प्रमाणात लागतात आणि अन्नसाठा काडीमध्ये मोठय़ा प्रमाणात असेल तर फक्त फुले भरपूर येतात व त्या मानाने पालवी कमी येते. नैसर्गीकरित्या डाळिंबास वर्षभरात ३ वेळा बहार येतो. तथापि योग्य अवस्था बहारासाठी आहे त्यासाठी खालील ३ बाबींचा विचार करावा. * बाजारपेठेतील मागणी - डाळिंब पिकास कोणत्या बाजारपेठेत चांगली मागणी केव्हा असते याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. म्हणजे त्यानुसार बहार धरणे सोईचे ठरेल. * हवामान - हिवाळा, उन्हाहा आणि पावसाळ असे ३ हंगाम आपल्याकडे आहेत. हिवाळ्यात कडक थंडी, पावसाळ्यात पाऊस व आर्द्रता आणि उन्हाळ्यात कडक उन्हाळा या बाबींचा विचर करून आपल्या बागेस बहार धरावा. * पाण्याची उपलब्धता - डाळिंब पीक काटक वर्गातील असले तरी बहाराच्या वेळेस या पीकास पाणी खूप लागते. परंतु जास्त पाणीसुध्दा या काळात घातक ठरते. पाणी टंचाई आहे काय व ती किती प्रमाणात व कधी असते याचा विचार करून बहाराची निवड करावी व बहार धरावा. एकदा बहार धरल्यानंतर तो पुढील ५ वर्षासाठी तरी कायम स्वरुपाचा असावा. त्याच्यात बदल करु नये. * बहार धरण्यासाठी करावयाच्या उपाययोजना - नैसर्गिक बाबींचा विचार करून इच्छीत वेळेस बोगस फुले आणणे म्हणजे बहार धरणे होय. बहार धरावयाचा म्हणजे बागेचे पाणी तोडायचे. जमिनीची मशागत करायची आणि खते घालून पाणी देण्याचे या प्रत्येक बाबींचा कार्यभाव काय असतो याचा सहसा विचार केला जात नाही. बागेचे पाणी प्रथम तोडायचे म्हणजे शेंडावाढ व पानेवाढ थांबवायची. म्हणजे नवीन वाढीसाठी जे अन्न लागते ते वाया जाऊ न देता काडीमध्ये साठवायचे. मशागत करण्याचाही तोच मुख्य उद्देश की जेणेकरून काडीमध्ये साठवायचे. पाणी तोडले की झाडाची वाढ थांबते व पानगळ होते. ज्यावेळी वर्षातून एकच ठरावीक बहार घेतला जातो. त्यावेळी पानगळ होण्यापूर्वीचा खोडात व फांद्यात अन्नसाठा करुन ठेवला जातो व त्यामुळे पाणी दिल्यानंतर फुले व पाने येण्यास अडचण येत नाही. डाळिंब झाडावर नवीन पालवी येते तेव्हा तिचा रंग पिवळसर पानाचे कार्य जोमाने सुरू होते. कर्खग्रहणाची क्रिया सुमारे ६ आठवडे चालली की त्या अवधीत भरपूर अन्नसाठा तयार होतो. अन्नसाठय़ाची क्रिया पूर्ण होत आली की पानगळ होण्यास सुरुवात होते. याचा अर्थ असा की, नवीन पालवी येऊन त्याचे कार्य पूर्ण होऊन पुन्हा पानगळ होण्यास १0 ते १२ आठवडे लागतात. -
विठ्ठल गोरे (कोठारी, अँग्रीटेक प्रा. लि., सोलापूर मो. ९५४५५५१८६२)
Post a Comment