0

राखीव मतदार आपल्याला हवा तोच उमेदवार उभा करायचा त्याच्या आडून, कारभार मात्र त्या-त्या मतदार संघातील प्रतिथयश राजकारण्यांनी करायचा ही राज्यातील राजकारणातील रित आहे. मात्र या प्रथेला मोहोळचे आ. रमेश कदम यांनी थेट आव्हान दिल्याने राजकीय रितीची ज्यांनी त्यांनी आपआपल्या सोयीसाठी आखलेली 'लक्ष्मण रेषा' मात्र मोहोळ मतदारसंघात 'पुसट' होणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात आहे. आ. कदम यांचा रोख या वक्तव्याच्या माध्यमातून नेमका कोणाकडे आहे. हे मात्र गुलदस्त्यात राहू शकत नाही. आ. कदम यांच्या वक्तव्याचा अर्थ जो तो आपआपल्या परीने लावत आहे. आ. कदम हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले तर मोहोळच्या राजकारणात भविष्यात आपसी संघर्ष उफाळून येणार यात मात्र वाद नाही. मोहोळच्या राजकीय गढीवरची सत्ता संपविण्यासाठी 'धाकल्या नेत्याने 'बारामतीच्या गादीवरून कट कारस्थान रचून आपल्या खास मजिर्तील सेनापती आमदारकीच्या रूपाने सोलापूर जिल्ह्यात पाठवून दिल्याचे राजकीय वतरुळात बोलले जाते. त्यामुळे अवघ्या पाच वर्षाच्या कालावधीत आ. कदम गढीवरची सत्ता खालसा करण्यात किती यशस्वी होतात. याची दीर्घ प्रतीक्षा मात्र करावी लागणार आहे. मी पुढील पंचवार्षिकमध्ये मोहोळमधून पुन्हा निवडणूक लढविणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा ही त्यांनी केली असल्याने त्यांना राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. तर दुसरीकडे आ. कदम यांची घोषणा हा राजकीय दबाव तंत्राचा भागही असू शकतो. हे दबाव तंत्र असलेतरी ते तंत्र किती परिणामकारक ठरणार हाही कळीचा मुद्दा आहे. ज्याची प्रशासनावर पकड तोच खरा सत्ताधीश हे सूत्र धरून राजकीय वाटचाल करणार्‍या आ. रमेश कदम यांना साहित्यर▪आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना असणारा अनुभव थेट बारामतीकरांशी असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध, अंगी असणारी दबंगगिरी या जोरावर मोहोळ विधानसभा मतदार संघात ठराविक व्यक्तीभोवती एकवटलेली सत्ता मुक्त श्‍वास घेईल असे राजकीय अभ्यासक सांगतात. परंतु, हे कार्य करत असताना 'दबावाला बळी पडून आ. कदम यांच्या माोहिमेत कोण सामील होणार हा मात्र कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी त्यांना 'एकला संघर्ष' करावा लागणार, हे मात्र सत्य आहे.

Post a Comment

 
Top