0

मंगळवेढा - संत दामाजी साखर कारखान्याचे प्रभारी चेअरमन सूर्यकांतमामा ठेंगील यांच्या मातोश्री कलावती ठेंगील यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले. यामुळे माढ्याचे खासदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज मुढवी येथे जावून ठेंगील कुटूंबियाचे सांत्वन केले. यावेळी रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहूल शहा, दामाजी कारखान्याचे संचालक भारत पाटील,पंचायत समितीचे माजी उपसभापती काशिनाथ पाटील, नगरसेक अजित जगताप, उदयसिंह मोहिते-पाटील इंग्लिश मेडियमस्कूल व्यवस्थापन समितीचे चेअरमन विजय बुरकूल,नगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य बाबा कोंडूभैरी, युवक नेते संदीप बुरकूल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक किसन गवळी, रतनचंद शहा बँकेचे संचालक मुझफ्फर काझी, कासेगावचे वसंतनाना देशमुख यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top