0

बसवेश्वर बेडगे

   पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक करतांना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी म्हटलं, “ते स्वत: झोपत नाहीत आणि ना आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना तसं करू देत.”

हैदराबादमध्ये आयोजित एक समारंभात केंद्रीय शहरी विकास आण संसदिय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं, “मी आज सकाळी म्हणत होतो, की आपले पंतप्रधान स्वत: झोपत नाहीत आणि दुसऱ्यांना झोपू देत नाहीत.” पण नायडू पुढं म्हणाले, ‘याचा आम्ही आनंद घेतोय कारण जनतेसाठी काम करणं. सामान्य जनतेच्या आयुष्य उत्तम बनविण्यासाठी काम करणं जीवनातील खूप आनंददायक बाब आहे.’  

जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की, देशातील प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं उपलब्ध करण्यासाठी पाच वर्ष लागतील, तेव्हा हे काम एका वर्षात पूर्ण झालं पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले. नायडूंनी सांगितलं, पंतप्रधान ‘जन धन योजना’ सुरू झाल्याच्या केवळ एकच आठवड्यात ६.९९ कोटी जनतेचं बँक खातं उघडल्या गेलं. 
-----------------------------------
-----------------------------------
 

Post a Comment

 
Top