उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये शिवसेना खासदार रवी गायकवाड आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. इतकंच नाही तर रवी गायकवाड यांना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा सत्कार करण्यापासूनही भाजप कार्यकर्त्यांनी रोखलं. महसूलमंत्री एकनाथ खडसे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या घरी चहापानाच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे गेले होते. त्यावेळी सेना खासदार रवी गायकवाड तिथे एकनाथ खडसेंच्या सत्काराला आले. मात्र तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय निंबाळकर आणि तुळजापूर मतदारसंघाचे उमेदवार संजय दुधगावकर यांनी त्याला आक्षेप नोंदवला.लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा प्रचार केला नाही, असा आरोप करत त्यांनी गायकवाडांना खडसेंचा सत्कार करण्यास मज्जाव घातला. त्यातून रवी गायकवाड आणि भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळही झाली. शिवाय त्यांच्यामध्ये धक्काबुक्कीही झाल्याचं कळतं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment