पंढरपूर / तालुका प्रतिनिधी
कचरेवाडी (मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर या कारखान्याचा प्रथम चाचणी गाळप हंगाम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. दरम्यान, गाळप हंगाम शुभारंभ मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी प्रय▪सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. ३ हजार ५00 मेट्रीक टन प्रतिदिन गाळपक्षमता असणारा युटोपियन साखर कारखाना सुरू होण्यामुळे पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कारखान्याची ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज झाली असून, श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना सभासदांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कारखाना उभारत असताना अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू व्हावे यासाठी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. कारखाना उभारणी करीत असताना स्थानिक बरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा परिचारक यांचा प्रय▪आहे. काटेकोर नियोजनामुळे पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा साखर उतार्यामध्ये जिल्ह्यात आघाडीवर असतो. दरवर्षी सभासदांचा अतिरिक्त ठरणारा ऊस हा इतर साखर कारखान्यांकडे गाळपासाठी पाठवावा लागत असे. यंदाच्या वर्षी ऊसाचे क्षेत्र अधिक असले तरी, युटोपियनच्या माध्यमातून चांगला पध्दतीने शेतकर्यांचा ऊस गाळप व्हावा यासाठी प्रय▪सुरू असल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment