ग्रामीण भागात गाव,वाडी, वस्तीवर सध्या डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहे . त्याचे खापर महापालिका व आरोग्यविभाग, प्रशासनावर फोडले जात आहे. मात्र, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शहरासाठी गावासाठी आपलीही काही जबाबदारी आहे. वेळीच उपाययोजना केल्यास त्यावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी जाणून घ्या नेमके डेंग्यु म्हणजे काय, त्यामागची कारणे व उपाय...
>> ही आहेत कारणे
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे होतो. डेंग्युचा प्रसार "एडीस एजिप्टाय" नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. यामध्ये प्रामुख्याने इमारतीच्या, सिमेंटच्या टाक्यांमधील, रांजणामधील पाणी तसेच प्लास्टिकच्या बादल्या, रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, निरुपयोगी टायर्स, कुलर आदींमध्ये साठलेल्या पाण्यावर या डासांची उत्पत्ती होते.
>> डेंग्युचा डास कसा ओळखाल ?
हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ सेंटीमीटर असते, या डांसाची मादी डेंग्यू रुग्णाला चावल्यानंतर ती पुन्हा निरोगी व्यक्तीला चावते व निरोगी व्यक्तीला डेंग्यु होतो या प्रकारे या रोगाचा प्रसार होतो. साधारणपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावते. जास्त दिवस पाणी साठलेले असल्यास त्यात हे डास(स्वच्छ पाण्यात)अंडी घालतात.एक डास एका वेळी दिडशे ते दोनशे अंडी घालतो त्यातून "एडीस एजिप्टाय"चा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो.
आपण हे करावे>
कोरडा दिवस पाळावा , कोरडा दिवस म्हणजे आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे रिकामे करावेत उदा> रांजण, माठ, हौद , टाकी व इतर हे पाण्याचे साठे घासून पुसून कोरडे करून तीन चार तासा नंतर पाणी भरावे त्यामुळे डासाची उत्पत्ती होणार नाही.
>> ही आहेत लक्षणे
"एडीस एजिप्टाय" डासाच्या संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर डेंग्युची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) अशा दोन प्रकारे हा आजार फैलावतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी , अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. याखेरीज एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, चव आणि भूक नष्ट होणे, मळमळणे आणि उलट्या आदी लक्षणेही जाणवितात.
>> हे आहेत उपाय
@ ताप असेपर्यंत आराम करा
@ताप कमी होण्यासाठी ‘पेरासिटेमोल’ गोळ्या घ्या
@ ताप अथवा वेदनाशामक म्हणून अस्पिरीन अथवा आयबुप्रोफेन गोळ्या घेऊ नयेत
@ निर्जलिकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजिवनी)
@ रक्तस्त्राव किंवा शोकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.
@ अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावेत
@ मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावा
@ साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे तसेच तुंबलेल्या गटारी वाहती करावीत तसेच खाली न करता येणार्या पाणी साठ्यात, उद > टाकी हौद यामध्ये गप्पी मासे सोडावेत
आपल्या घरी डेंग्यू ताप सर्वेक्षणसाठी येणार्या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करा व आपण आथवा इतर कोणीही अजारी असल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केद्रात संपर्क साधावा
Post a Comment