0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
गुंजेगाव येथील श्री क्षेत्र सोमलिंग देवस्थानचा जिर्णोध्दार व कळसारोहणानिमित्त बुधवारी सकाळी मुक्तेश्‍वर शिवाचार्य महाराज वेळापूरकर यांच्याकडून शिवदिक्षा विधी संपन्न झाला. आज दुपारी सोमलिंग चरणी रुद्राभिषेक व कलश पुजा होणार आहे. दुपारी ४ वाजता कलशशोभा यात्रा, सायंकाळी ६ वाजता शिवनाम जप, ७ वाजता मुक्तेश्‍वर शिवाचार्य महाराजांचे आशिर्वचन तर ८ वाजता कोळगिरी महाराजांचे शिवकिर्तन झाले. दि. ११ डिसेंबर रोजी सोमलिंग चरणी रुद्राभिषेक व कलश पुजा होणार आहे. सकाळी ११.११ वाजता श्री श्री श्री १00८ डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते कलशरोहणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गुरुनिर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महाराज, डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, मुक्तेश्‍वर शिवाचार्य वेळापूरकर महाराज यांच्या उपस्थितीत धर्मसभा होणार आहे. समस्त विरशैव समाज, गुंजेगाव व समस्त भजनी मंडळ गुंजेगाव यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Post a Comment

 
Top