मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
तालुक्यामध्ये विविध ग्रामपंचायतीमध्ये बसविण्यात आलेले सौरदिवे सध्या बंद पडलेले आहेत. हे सौरदिवे दुरुस्त करण्याच्या बाबतीत संबंधित कंपनीच्या वतीने दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे सौरदिवे बसविण्यात आलेला परिसर अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यकाळात चोर्या वाढणाची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चौका-चौकात विजेचे भारनियमन व बिलाच्या कचाट्यातून मुक्ती व्हावी या उद्देशाने शासनाने सौरऊज्रेचा पर्याय दिला. हे सौरदिवे बसविताना ठराविक स्वरुपात किंमत ठरविण्यात आली. यामध्ये पंचायत समिती स्तर,ग्रामपंचायत स्तर, १३ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना आदी माध्यमातून हे सौरदिवे ग्रामीण भागात बसविण्यात आले आहेत. या सौरदिव्यांच्या दुरुस्तीच्या बाबतीत संबंधित कंपनीच्या वतीने वारंटी म्हणून ठराविक कालावधी दिला पण, सध्या वारंटी असताना सुद्धा संबंधित कंपनीचे प्रतिनिधी ग्रामीण भागाकडे फिरकत नसल्याचे दिसत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment