तालुक्यात १00 शेडनेट उभे करणार
लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
कायमस्वरुपी दुष्काळाशी सामना करणार्या मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्यांना कमी पाणी असल्याने नैसर्गिक शेती करता येत नाही. वारंवार बदलणारे हवामान कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. याचा सामना करण्यासाठी शेडनेट शेती हा एकमेव पर्याय असून फेब्रुवारी अखेर तालुक्यात १00 शेडनेट उभा करणार असल्याचे कृषीक्रांती फार्मस क्लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी सांगितले. मंगळवेढा येथे शेडनेट करण्यासाठी इच्छुक शेतकर्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, औदुंबर वाडदेकर, शरद हेंबाडे, सुनील डोके, हरिभाऊ यादव, आण्णा माळी, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रम सावंजी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पडवळे यांनी सांगितले की, अत्यंत कमी पाण्यावर कमी मनुष्यबळ व कमी जागेवर जास्त उत्पादन घेण्यासाठी शेडनेट हा उत्तम पर्याय असून तरूणानी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीची कास धरून मंगळवेढय़ात हरितक्रांती घडविण्यासाठी सज्ज रहावे. यावेळी प्रा. भगत, औदुंबर वाडदेकर, सुनील डोके, आण्णा माळी, बापू मेटकरी, आलापे, विक्रम सावंजी यांनी मनोगत व्यक्त केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment