मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर महावितरणकडे लेखी तक्रार केल्यास दोन दिवसात महावितरणचे ठेकेदार स्वत: येवून स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर नेणार आहेत. आठ दिवसात स्वखर्चाने व वाहनाने दुसरा ट्रान्सफॉर्मर आणून बसविणार आहेत. दहा दिवसात महावितरणने दखल न घेतल्यास आमदार भारत भालके यांच्याशी संपर्क साधावा व एक रुपायाही लाच न देता आपला ट्रान्सफॉर्मर बदलून घ्यावा, असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले. ट्रान्सफॉर्मर घेवून जाणे व आणणे, दुरुस्त करणो ही सर्व जबाबदारी महावितरणची आहे. महावितरणच्या बिला पाठीमागे महावितरणने हे मान्य केले आहे. महावितरणच्या अधिकार्यांबरोबर याबाबत चर्चा झाली असून या पुढील काळात कोणत्याही शेतकर्याला ट्रान्सफॉर्मरबाबत त्रास होणार नाही. वीज गळती, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, ऑईल आदी सर्व प्रकारचा खर्च महावितरणने ग्राहकाकडून घेतलेला आहे. त्याच खर्चातून महावितरण ही दुरुस्ती करत आहे. परंतू शेतकरी झीरो वायरमन आणून ट्रान्सफॉर्मर ने आण करत आहेत. यामुळे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची फुकट दिवाळी होत आहे. हा खर्च अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर वाटून घेवून खात आहेत. यामुळे शेतकर्यांनी लेखी तक्रार करावी, अधिकार्यांच्या मोबाईलवर एस.एम.एस. करावा, दहा दिवसाने आमदार कार्यालयात किंवा थेट आमदारांशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. भालके यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment