नंदेश्वर / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका हा सतत दुष्काळात आहे. या भागात पाण्यासाठी जनता दाहीदिशा भटकत आहे. दक्षिण भागातील ३५ गावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी पुरेपूर प्रय▪करुन या भागातील जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे जागणार असल्याचे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केले. ते नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत भोसे व ३९ गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती निर्मला तानाजी काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा, नगराध्यक्षा अरुणाताई दत्तु, अधिक्षक अभियंता सुखदेव गरंडे, कार्यकारी अभियंता मुकुंद भालेराव, दामाजीचे चेअरमन सुर्यकांत ठेंगील, कार्यकारी अभियंता राजकुमार चंदनशिवे, जि.प. सदस्या अंकिता गरंडे, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, माजी सभापती संभाजी गावकरे, लता कोळेकर, उपअभियंता सतीशकुमार सुर्यवंशी, दत्ता यादव, भारत नागणे, दादासाहेब गरंडे, सरपंच बाळासाहेब गरंडे यांच्यासह तालुक्यातील नेतेमंडळी विविध गावचे सरपंच, विविध संघटनाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment