कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार
मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील वीज वितरणमधील एका सहाय्यक अभियंत्याच्या संगनमताने वीज चोरी सुरू असल्याचे उघड झाले आहे.संबंधित अधिकार्याने वीज मीटर चालू असताना फॉल्टी लेखी पत्र वरिष्ठांना देवून वीज चोरीला पाठबळ देवून कंपनीला बुडवण्याचा प्रकार केला आहे. संबंधित मीटर वरिष्ठ अधिकार्यानी जप्त केले आहे. गंभीर प्रकरणाचा अहवाल अधिक्षक अभियंता यांच्याकडे पाठविला आहे. या घटनेमुळे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी वीज चोरी राजरोसपणे चालू असून नंदेश्वर येथे दूध डेअरी मध्ये वीज चोरीप्रकरणी १२ लाख १५ हजारांचा दंड केला होता. मात्र ही वीज चोरी दोन वर्षापासून सुरू असल्याचे तपासणी दरम्यान उघड झाले. या वीज चोरीला जबाबदार असणार्या निंबोणी विभागाच्या कनिष्ठ अभियंता व लाइनमन यांच्यावर अद्यापही कोणतीच कारवाई न केल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्याला कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निंबोणी येथील ३३ केव्ही उपकेंद्राअंतर्गत नंदेश्वर गाव येत आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुभाष कोळेकर यांच्या भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या अधारे नंदेश्वर येथील दूध डेअरीवर छापा टाकला असता ७७ हजार युनिटची वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. यावेळी संबंधीत अधिकार्यानी डेअरी चालकास १२ लाख १५ हजार दंड ठोठावला. या दूध संकलन केंद्रास ६0 एच.पी.व ३ एच. पी. अशा ६३ एच.पी.चा विद्युत लोड असल्याचे तपासणी दरम्यान उघड झाले. एवढी मोठी वीज चोरी २२ महीने रात्रंदिवस सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या २२ महिन्याच्या वीजचोरी कालावधीत ३ कनिष्ठ अभियंते कार्यरत होवून गेले. या तिन्हीही अधिकार्यांच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे वाव मिळाला. हे तिघेही वीजचोरीला जबाबदार आहेत. महिन्याचे रिडिंगदरम्यान वीजवापराबाबत खबरदारी करण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांची असताना त्यांनी ही जबाबदारी टाकल्याने २२ महीने खुलेआम ही वीजचोरी सुरू राहिली होती. कोळेकर यांच्या पथकाने तपासणी केली नसती तर किती महीने वीज चोरीचा हा गोरखधंदा सुरू राहिला असता? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मंगळवेढा महावितरणाच्या इतिहासात सर्वात मोठी वीज चोरीचा घटना असून संबंधीत ग्राहकाने पोलिस कारवाईची ससेमिरी मागे लागू नये म्हणून तात्काळ दंडाची १२ लाख रक्कम भरून प्रामाणिकपणा दाखविला. मात्र महावितरणचे वरिष्ठ अधिकारी संबंधित दोषी कनिष्ठ अभियंत्यासह कारवाई करण्यात प्रामाणिकपणा दाखवला आहे. ही कारवाई करण्याचे अधिकारी पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ यांना आहेत. दोषी अधिकार्यांची पाठराखण केल्यास अशा वीज चोरी घटनांना आळा बसणार नाही व कंपनीचे नुकसान होईल, तोटा वाढेल अशी अवस्था दिसते. या वीजचोरीला महिना उलटला तरी पण वीज चोरीस कारणीभूत असणार्या कनिष्ठ अभियंत्याची माहिती व ठावठिकाण सापडत नसल्याने कारवाईस उशीर होत आहे. संबंधित डेअरीत वीज कलेक्शन देतानाच बेपवाई झाल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ अधिकारी महावितरणला बुडवणार्या त्या सहाय्यक अभियंत्यावर कारवाई होणार की वाचवले जाणार याकडे संपूर्ण तालुक्यातचे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment