मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
दामाजी कारखाना मंगळवेढा तालुक्याचा कारखाना म्हणून तालुक्यातील ऊस उत्पादक आपला ऊस दामाजी कारखान्याला देत आहेत. सध्या सुमारे दीड लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले आहे. सभासदांना पहिली उचल मिळाली नव्हती. तरीदेखील विश्वासाने ऊस दामाजीला दिला जात होता. प्रभारी चेअरमन सूर्यकांत ठेंगील व संचालक मंडळाने इतर कारखान्यांप्रमाणे पंधराशे रुपयाची पहिली उचल देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दामाजी देखील तालुक्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने पहिली उचल देण्यात यशस्वी झाला आहे. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना उभारणीच्या काळापासून आत्तापर्यंत नेहमी आर्थिक अडचणीत सापडला आहे. माजी आमदार व संस्थापक किसनलाल र्मदा यांनी मोठय़ा आर्थिक अडचणीत कारखान्याची उभारणी केली. सभासद होण्यासाठी शेतकर्यांकडे पैसे नसल्यामुळे सोसायटीच्या माध्यमातून सभासद केले होते. पाणी नसल्यामुळे प्रकल्पाला मंजूरी मिळत नव्हती, उजनी प्रकल्पाच्या पाण्यावर मंजूरी मिळाली आणि मोठय़ा हिमतीने मारवाडी वकिलांनी कारखाना चालवून दाखविला. राज्य शासनाने, केंद्र शासनाने मदत केल्यास दामाजी जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या पाठोपाठ दर देवू शकणार आहे. 'दामाजी'ची रिकव्हरी चांगली असून संचालक मंडळ, कामगार, सभासद हे विश्वासाने काम करुन हंगाम यशस्वी करण्यासाठी दामाजी कारखाना कायमस्वरुपी चांगला राहण्यासाठी काम करत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment