0
 शहरातील गंभीर गुन्ह्यात वाढ
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २0१४ मध्ये गंभीर स्वरूपाचे (भाग १ ते ५) २२८ गुन्हे दाखल झाले, तर त्यापैकी १८२ उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र गंभीर गुन्हे २0१३ मध्ये २४४, तर २0१४ मध्ये २४३ इतके दाखल झाले आहेत.मागोवा७ खून, ५ जणांच्या खुनाचा प्रयत्न; २२ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव


 शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरत्या वर्षात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र समोर आले आहे. दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात एकूण ७ खून झाले असून ५ जणांच्या खुनाचा प्रय▪झाला आहे. या वर्षात झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे गुन्हेगारी वाढण्यास हातभार लागल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द शहरातून तब्बल २२ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अध्यात्मिक राजधानी अशी ओळख असलेल्या पंढरीतील विविध प्रकारची गुन्हेगारी वाढतच चालली आहे. शहरासह तालुक्यात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, चोर्‍या, घरफोड्या अशा गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही लक्षणीय राहिले आहे. २0१४ या सरत्या वर्षात शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ४ खून झाले असून त्यापैकी २ खुनांची उकल अद्यापही झालेली नाही. ४ जणांच्या खुनाचा प्रय▪झाल्याचे समोर आले आहे. २0१३ मध्येही ४ खून आणि ४ जणांच्या खुनाचा प्रय▪झाला होता. मात्र, हे सर्व प्रकार उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. गेल्या वर्षभराच्या कालावधीत बलात्काराचे २, तर विनयभंगाचे ५ गुन्हे घडले आहेत. एकही दरोडा पडलेला नाही. तसेच जबरी चोर्‍यांवरही चाप लावण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसून आले आहे. या वर्षभरात केवळ १ जबरी चोरी झाली. २0१३ मध्ये अशा ८ चोर्‍या झाल्या होत्या. त्यापैकी केवळ ४ चोर्‍या उघडकीस आल्या होत्या. २0१४ मध्ये इतर सर्व प्रकारच्या चोर्‍या ७६ झाल्या असून ३५ चोर्‍या उघडकीस आल्या आहेत. अशांतता निर्माण करणारे तब्बल १८ दंगे झाले आहेत. २0१३ मध्ये अशा ९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सरत्या वर्षात शहरात ९४५ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. तसेच तब्बल २२ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत. २0१३ मध्ये २४६ लोकांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती, तर ३ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. २0१४ मध्ये १७ ठकवणुकीचे प्रकार घडले असून त्यापैकी १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. शहरातील गुन्हेगारीला पायबंद लावण्यासाठी शहर पोलीस कडक उपाययोजना करीत असून याला गेल्या वर्षभरात यश आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले. ७६ गावांची शांतता, सुरव्यवस्था राखणार्‍या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात ३ खून झाले, तर एकजणाच्या खुनाचा प्रय▪झाला आहे. यासह वर्षभरात गंभीर स्वरूपाचे २४३ गुन्हे घडले आहेत. २0१४ मध्ये दरोड्याचे २, घरफोडी १, मारामारी-दंगे १0 असे गुन्हे घडले. या वर्षात बलात्काराचे २, तर विनयभंगाचे १७ गुन्हे दाखल झाले आहेत. हयगयीने वाहन चालविण्यामुळे २0१४ मध्ये ३0 अपघात झाल्याची नोंद झाली आहे. सरत्या वर्षात ९८0 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दारूबंदीचे १९५, तर अवैध प्रवाशी वाहतुकीचे ४८0 गुन्हे दाखल झाले आहेत. २0१४ मध्ये १ हजार ६६९ किरकोळ गुन्हे (एनसी) दाखल झाल्याचे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले. 

Post a Comment

 
Top