0
मंगळवेढा 
 असा ही एक शेवट असतो, जिथून होते सुरुवात पुन्हा मनातला काळोख उजळ करत, लुकलुकतात सार्‍या खुणा कवयित्री शांता शेळके यांच्या या काव्यात्मक ओळी या बरेच काही सांगून जात असताना खर्‍या अर्थाने सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना मांसाहार आणि मद्य पान करणे एक 'फॅशन' झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील बोकड आणि कोंबड्यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी होत आहे. हॉटेल्स, फार्महाऊसवर रंगीत पाटर्य़ांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूणच नव्या वर्षाचे स्वागत अन् ३१ डिसेंबरची रात्र अविस्मरणीय करण्यासाठी तरूणाई सज्ज झाली आहे. मांसाहारासाठी बाजारातून तीन हजारांपासून दहा हजारांपर्यंतचे बोकडांची विक्री होत आहे. सातशे ग्रॅमपासून ते एक किलोपर्यंतच्या गावराण कोंबडीची किंमत पाचशे ते सहाशे रुपये झाली आहे. शहरातील निरनिराळ्या हॉटेल्स आणि मित्रांच्या ग्रुपने नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी चालविली आहे. पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना ३१ डिसेंबर च्या रात्री मांसाहार आणि मद्य घेऊन बेधुंद होऊन संगीताच्या तालावर अनेक जण थिरकतात. निरनिराळ्या ठिकाणच्या हॉटेल्स, फार्महाऊसवर अशा रंगीत पाटर्य़ांचे नियोजन केले जात आहे. अर्थात याची तयारी एक आठवडा अगोदरच मांस विक्रेत्यांनी चालविली आहे. बाजारात ३१ डिसेंबरसाठी मोठय़ा प्रमाणात बोकड आणि कोंबड्या खरेदी केल्या जात आहेत. खवय्यांकडून बोकडाच्या मांसाला सर्वाधिक पसंती दिली जाते. त्यानंतर गावराण कोंबडीचे मांस पसंत केले जाते. मटनाचे दर वाढले आहेत. गेल्या वर्षी बोकडाचे मटन ३२0 रुपये किलो तर कोंबडीचे मटन ३२0 रुपये किलो होते. यंदा हा दर अनुक्रमे ३८0 आणि ३६0 रुपये असा झाला आहे. मांसाहार करणार्‍यांची संख्या वाढली आहे. पण त्या तुलनेत मांसासाठी बोकड आणि कोंबड्या वाढलेल्या नाहीत. साहजिकच दर कडाडले आहेत. सर्वसाधारणपणे किलोभर येणारी गावराण कोंबडी पाचशे ते सहाशे रुपयांना आहे. बोकड दहा हजारांपर्यंत आहेत. बोकडाच्या किंमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी सर्व बिअरबार, परमीट रुम व ढाबा व हॉटेल्स यांना नोटीसाद्वारे कायद्याचे पालन करण्याचे कळविले आहे. शहरात आठ बिअरबार, परमीट रुम तर ग्रामीण भागामध्ये हुलजंती, कात्राल, माचनूर, भोसे, मल्लेवाडी याठिकाणी बिअरबार, परमीट रुम असून प्रत्येक गावात किरकोळ व चोरून देशी व विदेशी व्यावसायिक मद्याची विक्री करत असून यावरही पोलिस खात्याचे बारीक लक्ष असणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात तरुणाई कडून येणार्‍या २0१५ चे जोरदार स्वागत फटाक्याचा आतिषबाजी व पाटर्य़ासह केले जाणार आहे तर अनेक बियर-बार व परमीट रुम मध्ये खास करून गार्डनमध्ये एल.सी.डी. द्वारे ग्राहकांची करमवणूक होणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना नियमांचे पालन सर्वांनी करावे, मद्यपान करून वाहने चालवू नयेत, जबाबदारीने नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नियम व कायद्याचे पालन करावेनवीन वर्षाचे स्वागत करताना शहर व परिसरातील हॉटेल व ढाबे मालकांनी तसेच जल्लोष व पाटर्य़ा करणार्‍यांनी ठरवून दिलेल्या नियम व कायद्याचे पालन करावे व गैर वर्तन करणारे नागरिक आढळल्यास कारवाई करण्यात येईल. - दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक. 

Post a Comment

 
Top