सुभाष देशमुख यांचे नाव आघाडीवर
मुंबई / विशेष प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार येत्या आठवड्यात होण्याची शक्यता असून त्यासाठीभारतीय जनता पार्टीसह स्रवच पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे वृत्त आहे. नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भाजपातील संभाव्य मंत्र्यांच्या यादी निश्चित केली असल्याचे कळते. या विस्तारात मंत्र्यांचा शपथविधी अपेक्षित असून त्यात भाजपाच्या वाट्याला सहा मंत्रीपदे येणार आहेत. त्यात सोलापुरातून डॉ. सुभाष देशमुख, धुळ्यातून जयकुमार रावल, बुलढाण्यातून डॉ. संजय कुटे, चैनसुख संचेती, पांडुरंग फुंडकर, नाशिकमधून देवयानी फरांदे हे इच्छुक आहेत. चैनसुख संचेती हे इच्छुक असले तरी तेथूनच संजय कुटे आणि पांडुरंग फुंडकर हे दोन तगडे इच्छुक असल्याने कोणाच्या नावाला काट मारावीयाबाबत संभ्रम असल्याचे कळते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना मंत्रीपद अपेक्षित आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला एक आणि शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनाही मंत्रीपद मिळू शकते. रिपाईंला राज्यतच नव्हे तर केंद्रातही सत्तेत वाटा हवा आहे. मित्र पक्षांच्या सदस्यांना सत्तेत सहभागी करून घेतना भाजपाला त्यांना आपल्या कोट्यातील विधान परिषदेच्या जागाही सोडाव्या लागणार आहते. या जागा सोडताना हे उमेदवार आपल्या पक्षाच्याच तिकिटावर निवडून येतील यादृष्टीने भाजपाचे नेते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांना परिषदेत स्वत:चे संख्याबळ वाढविणे शक्य होईल. मित्र पक्ष याला कोणता प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक असेल, असे जाणकारांना वाटते. शिवसेनेच्या दोघा राज्यमंत्र्यांचा शपथविधीही व्हायचा आहे. पहिल्या विस्तारात शिवसेनेने बहुसंख्य सदस्य विधान परिषदेतील दिले आहेत. त्यामुळे यावेळी विधानसभेतून मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता आहे. याच दृष्टीने शिवसेनेतही जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे समजते. मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुंबईला आणखी एखादे मंत्रीपद मिळू शकते का याची चाचपणी मुंबईतील भाजपा नेत्यांकडून केली जात असून त्यासाठी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार तसेच राज पुरोहित इच्छुक आहेत. ठाणे जिल्ह्यातून संजय केळकर, डोंबिवलीचे रविंद्र चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मुरबाडचे किसन कथोरे जरी मंत्रीपदासाठी इच्छुक असले तरी राष्ट्रवादीतून आलेल्यांना लगेच मंत्रीपद द्यायचे नाही, असे भाजपात ठरले आहे. त्यामुळे कथोरे यांचा मंत्रीमंडळ समावेश धूसर असल्याचे सांगण्यात येते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment