नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती यापुढे व्हॉट्सअँपवरून आल्यास आश्चर्य वाटायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नव-माध्यमांवरील कल पाहता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय जनतेला महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी व्हॉट्सअँपची मदत घेण्याचा विचार करत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी निगडित एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार विविध सोशल माध्यमांना एकत्रित आणून व्हॉट्सअँप आणि 'टॉकेथॉन'च्या माध्यमातून थेट संवाद साधण्याच्या शक्यतासुद्धा पडताळून पाहत आहे. त्यामध्ये फेसबुक, ट्विटर आणि यू-ट्यूबचासुद्धा वापर केला जाऊ शकतो. 'सद्य:स्थितीला व्हॉट्सअँपमध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांना संदेश पाठवण्याची कमाल र्मयादा खूपच कमी आहे. त्यासाठी वेगवेगळे गट तयार करून तेवढय़ाच सदस्यांसाठी एक-एक ग्रुप अँडमीन ठेवणे कठीण आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय अशा समस्यांवर मात करण्यासाठी एका विशेष सॉफ्टवेअरची तयारी करत आहे.' यामध्ये विविध विषयांवर चर्चासुद्धा केली जाईल, अशी माहितीसुद्धा नाव सांगण्याच्या अटीवर एका अधिकार्याने दिली. २0१४ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय चित्रपट समारंभात ही संकल्पना मांडली होती. 'स्मार्टफोनधारक' नागरिकांना विविध महत्त्वपूर्ण दिनाची माहिती देणे, योजनांचा तपशील देणे तसेच त्यांना जागरूक करण्यासाठी ही मोहीम उपयोगी पडणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment